News Flash

‘एक ते दोन महिन्यांमध्ये…’, दयाबेनच्या वापसीवर असित मोदींचा मोठा खुलासा

एका मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, चंपकलाला, तारक मेहता ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ४ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत. आता एका मुलाखतीमध्ये मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या वापसीवर वक्तव्य केले आहे. दोन तीन महिन्यांमध्ये ती मालिकेत दिसणार असल्याचे म्हटले आहे.

नुकताच असित मोदी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना दयाबेनची मालिकेत केव्हा एण्ट्री होणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘खरं सांगू तर मला मनापासून वाटते आणि चाहत्यांना देखील वाटते की दयाबेन परत यावी. त्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे’ असे उत्तर दिले.

आणखी वाचा : ‘तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?’ असे विचारणाऱ्याला जाणून घ्या रिंकू काय म्हणाली

पुढे दिशा वकानीच्या परत येण्यावर ते म्हणाले, ‘ती प्रेग्नंट होती, त्यानंतर तिला बाळ झाले, आम्ही देखील विचार केला की तिला बाळासोबत थोडा वेळ घालवू द्यावा आणि तिच्या नसण्याने इतका फरक पडला नाही. सर्वजण मालिका एन्जॉय करत होते. आता मालिकेला दयाबेनची गरज आहे. एक किंवा दोन महिन्यात दयाबेन परत येईल.’

आणखी वाचा : ‘नवरा दिसायला कसा हवा?’, उत्तर देत जुई गडकरीने जिंकली चाहत्यांची मने

‘चाहत्यांनी दयाबेन म्हणजेच दिशा वकानीवर जितके प्रेम केले तितके प्रेम पुन्हा मिळणे गरजेचे आहे. काही मोजक्याच लोकांना इतकं प्रेम मिळतं. त्यामुळे प्रेक्षक करत असलेल्या प्रेमाची दिशाला कदर आहे आणि ती स्वत: पुन्हा मालिकेत येणाचा प्रयत्न करेल. पण जर तिला वाटत असेल की तिचे कुटुंब तिच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे तर आम्ही तिच्या त्या निर्णयाचा देखील आदर करु’ असे असित पुढे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 4:59 pm

Web Title: tarak mehta ka oolta chashma asit modi bring back dayaben avb 95
Next Stories
1 ‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीने केला साखरपुडा
2 करण जोहरच्या ‘दोस्ताना-2’मध्ये कार्तिक आर्यनच्या जागी ‘या’ अभिनेत्यांची एण्ट्री
3 ‘सुशांतसारखे कार्तिकलाही आत्महत्येस…’, कंगनाचे ट्वीट चर्चेत
Just Now!
X