News Flash

टिक-टॉकचं रेटिंग पुन्हा ४.४ वर; गुगलने ‘अशी’ केली मदत

टिक-टॉकची लोकप्रियता पूर्वपदावर

टिक-टॉक आणि युट्यूब इंटरनेटवरील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप म्हणून ओळखले जातात. मनोरंजनासाठी या अ‍ॅप्लिकेशनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु गेल्या काही काळात सोशल मीडियावर सुरु झालेल्या टिक-टॉक विरुद्ध युट्यूब या वादामुळे टिक-टॉकच्या रेटिंगमध्ये कमालीची घसरण झाली होती. परंतु गुगलच्या मदतीने टीक-टॉकने आपली लोकप्रियता पूर्वपदावर आणली आहे.

टिक-टॉकने असं केलं काय?

काही दिवसांपूर्वी टिक-टॉक आणि युट्यूब या दोन अ‍ॅप्लिकेशन्समध्ये श्रेष्ठ कोण? असा वाद निर्माण झाला होता. परिणामी दोन्ही कम्युनिटीमधील युजर्स मोठ्या प्रमाणावर एकमेकांविरोधात टीका करत होते. या वादाचा परिणाम टिक-टॉकचा रेटिंगवर झाला. अनेकांनी या अ‍ॅपविरोधात निगेटिव्ह रिव्ह्यू लिहिण्यास सुरुवात केली. परिणामी टिक-टॉकचं रेटिंग ४.४ वरुन १.२ पर्यंत पोहोचलं होतं. परंतु टिक-टॉकने गुगल प्लेच्या मदतीने पुन्हा एकदा आपली लोकप्रिया पूर्वपदावर आणली आहे. त्यांनी निगेटिव्ह रिव्ह्यू, व्हिडीओज, कॉमेंट सर्व काही डिलिट करुन पुन्हा एकदा आपले रेटिंग ४.४ पर्यंत आणले आहे.

टीक टॉक भारतात देखील खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जवळपास १ कोटी २० लाख भारतीय नेटकरी अ‍ॅपचा वापर करतात. विशेष म्हणजे हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जास्त व्हूज मिळवणारे टिक-टॉकर्स या अ‍ॅपवरुन पैसे देखील कमावतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 1:27 pm

Web Title: tiktoks ratings moved up to 4 stars on google play mppg 94
Next Stories
1 भूमी पेडणेकरचं ट्विट वाचून अमिताभ बच्चन संभ्रमात; ‘त्या’ शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी बिग बींची धडपड
2 रिचाने शेअर केला तिचा कधीही न पहिलेला फोटो; हा फोटो इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
3 लहान मुलांसाठी सलमान होणार कार्टून; येतोय चुलबुल पांडेचा अ‍ॅनिमेटेड अवतार
Just Now!
X