News Flash

Khatron Ke Khiladi 11 : पहिलं एलिमिनेशन ! ‘बिग बॉस’चा हा एक्स कंटेस्टेंट झाला आऊट

पहिल्या एलिमिनेशनच्या बॉटम 3 मध्ये कुणाची नावं ?

‘खतरों के खिलाडी 11’ हा शो सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच चर्चेत आलाय. या शोसाठी १२ बड्या कलाकारांची टीम शूटिंगसाठी केपटाउनमध्ये आहे. या शोसाठीची शूटिंग देखील सुरू झाली आहे. केपटाउनमध्ये पोहोचल्यानंतर या टीममधला प्रत्येक जण आपआपले फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून नवी अपटेड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांचं मनोरंजन देखील करत आहेत. अशातच ‘खतरों के खिलाडी 11’  च्या पहिल्या एलिमिनेशनबाबतीत एक बातमी समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या एलिमिनेशनमध्ये बाहेर झालेला स्पर्धक हा यापुर्वी ‘बिग बॉस’मध्ये सुद्धा दिसून आला होता.

ही बातमी वाचल्यानंतर राहुल वैद्य, अभिनव कोहली, निक्की तंबोळी आणि विशाल आदित्य सिंह यांच्यापौकी कुणी असेल का, असा विचार तुम्ही करत असाल. तर यासाठीची तुमची उत्सुकता आणखी जास्त वाढवत नाही. ‘खतरों के खिलाडी 11’ च्या पहिल्या एलिमिनेशनमध्ये विशाल आदित्य सिंह हा आऊट झालाय. विशाल हा या शोमध्ये पहिल्या एलिमिनेशनमध्ये बाहेर गेलेला पहिला स्पर्धक आहे. पहिल्या एलिमिनेशनमध्ये विशाल, निक्की तांबोळी आणि अनुष्का सेन हे एकत्र बॉटम 3 मध्ये होते. यातून विशाल आदित्य सिंह हा शोमधून बाहेर झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishal Aditya Singh (@vishalsingh713)

किती एपिसोडमध्ये होणार हा शो ?
शोसाठीच्या शूटिंगसाठी केपटाउनमध्ये गेलेली सर्व टीम येत्या जूनमध्ये भारतात परतणार होती, त्यानुसार त्यांचे तिकीट देखील बुक करण्यात आले होते. परंतू देशभरात करोनाचा हाहाकार सुरू असल्याचं पाहून शोच्या मेकर्सनी ‘खतरों के खिलाडी 11’ची शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण टीमला भारतात येण्याचे आदेश दिले आहेत. यामुळेच हा शो एकूण १२ एपिसोडमध्ये शूट करून संपवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. केपटाउनमध्ये गेलेली सर्व टीम शूटिंग संपवून येत्या महिन्याभरात भारतात परतणार आहे.

‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये राहुल वैद्य, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, सना मकबूल, विशाल आदित्य सिंह, अभिनव शुक्ला, आस्था गिल, महक चहल और निक्की तंबोळी सारखे सेलिब्रिटीज हे स्प्धक म्हणून सहभागी झाले आहेत. केपटाउनमधून या सर्व स्पर्धकांचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज देखील समोर आले आहेत. त्यांचे सर्व फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 1:41 pm

Web Title: tv khatron ke khiladi 11 elimination bigg boss ex contestant vishal aditya singh out from the show prp 93
Next Stories
1 “आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे..”; अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत
2 The Family Man 2: प्रतिक्षा संपली, या दिवशी रिलीज होणार मनोज वायपेयीच्या सिरीजचा ट्रेलर!
3 “तू तर आमिर खानचा मुलगा आहेस ना?”; नेटकऱ्याच्या प्रश्नावर आयराचं सडेतोड उत्तर
Just Now!
X