News Flash

“माझ्याकडे नवरा आहे जो…”; ट्रोलरला ट्विंकल खन्नाचं हटके उत्तर

'त्या' फोटोवर युजरने केली कमेंट

(photo-instagram@Twinkle Khanna)

मिसेस खिलाडी म्हणजेच अभिनेत्री ट्विंकल खन्नाने 9 मे ला मदर्स डेच्या निमित्ताने आई डिंपल कापडियासोबत एक खास फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र ट्विंकलला तिच्या या फोटोवरून एका नेटकऱ्याने ट्रोल केलं आहे. तर ट्विंकलनेही या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलंय.

ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केलाय. या फोटोत एका सोफ्यावर ट्विंकल आणि तिची आई अभिनेत्री डिंपल कापडिया बसलेल्या दिसत आहेत. दोघीही आपापल्या कामात व्यस्त दिसतायत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ट्विंकल म्हणालीय,” सध्याच्या परिस्थितीत अगदी उत्तमरित्या मातृदिन पार पडला. आम्ही दोघी आमचे हात स्थिर ठेवू शकत नाही. ती स्केचिंग करतेय. मी माझं एम्ब्रोडरी वर्क करतेय आणि आम्ही दोघी यात पूर्ण वेळ गप्पा मारतोय..मातृदिनाच्या शुभेच्छा” असं कॅप्शन देत तिने आईसोबत कसा वेळ घालवला हे सांगितलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकलच्या या फोटोवर एक चाहता म्हणाला, ““तू असे फोटो कसे क्लिक करतेस? तू कुणाला हे फोटो काढायला सांगतेस का की तुझ्याकडे असे फोटो काढण्यासाठी खास डिव्हाइस आहे?” चाहत्याने विचारलेल्या या प्रश्वावर ट्विटंकनेदेखील उपहासात्मक उत्तर दिलंय.

user on twinkkle-khanna

ट्विंकल खन्ना या युजरला म्हणाली, ” हाहाहा.. माझ्याकडे एक नवरा आहे जो असे काही फोटो घेत असतो. त्यामुळे हो दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर माझ्याकडे एक खास डिव्हाइस आहे.” असं मजेशीर उत्तर ट्विंकलने युजरच्या प्रश्नावर दिलंय.

twinkkle-khanna

अक्षय कुमार आणि ट्विटंकल खन्ना यांच्या लग्नाला जवळपास 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना 18 वर्षांचा आरव हा मुलगा आहे. तर ८ वर्षाची मुलगी असून तिचं नाव नितारा आहे. ट्विंकल आणि अक्षय कुमार अनेकदा आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 9:11 am

Web Title: twinkle khanna replay to troll who asked her do u have specific device for photo said i have husband kpw 89
Next Stories
1 “…तर त्यासाठी २०३५ साल उजाडेल”; सोनू सूदने व्यक्त केली खंत
2 Mother’s Day : “स्वत:चे पोट कसे भरायचे हे मला आईने शिकवले”, लता दीदींनी केला खुलासा
3 “…तर मी पण वाचलो असतो”, फेसबुक पोस्टनंतर काही तासातच युट्युबरचा मृत्यु
Just Now!
X