News Flash

उर्वशी रौतेलाचा टफ वर्कआउट पाहून चाहत्यांना फुटला घाम !

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधली सर्वात फिट अभिनेत्री मानली जाते. सध्या तिचा टफ वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

urvashi-rautela-gym-video

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये नेहमीच घाम गाळत असते. तिचे अनेक वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे हे व्हिडीओ पाहून चाहते सुद्धा स्वतःच्या फिटनेससाठी प्रेरित होतात. अशात अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा आणखी नवा वर्कआउट व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये ती जिममध्ये अतिशय टफ वर्कआउट करताना दिसून येतेय. या व्हिडीओमधला उर्वशीचा हा टफ वर्कआउट पाहून लोक हैराण झाले आहेत. तसंच फिटनेसाठीचं ती घेत असलेली मेहनत पाहून तिचं कौतुक देखील केलं जातंय.

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा हा नवा वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री उर्वशीने जिम आउटफिट्स परिधान केले असून व्यायाम करताना दिसून येतेय. अभिनेत्री उर्वशीचे तिच्या इन्स्टाग्रामवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर एकूण ४० मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर केला असला तरी सोबत कॅप्शन मात्र लिहिण्यात तिचा गोंधळ उडाला. “40 मिलियन लव्ह…माझ्या या वर्कआउट कॅप्शन द्या प्लीज.” असं लिहित तिने हा नवा वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केलाय.

आणखी वाचा: शेहनाजसोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार होता सिद्धार्थ शुक्ला; साखरपुडाही झाला होता

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 6:45 pm

Web Title: urvashi rautela shares her latest workout video and asks fans to name it prp 93
Next Stories
1 ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल
2 चिरंजीवीची पत्नी मेघना राजने केला मुलाच्या नावाचा खुलासा, म्हणाली…
3 न्यासाच्या ‘सिक्रेट बॉयफ्रेंड’विषयी जर अजयला कळाले तर…; काजोलने व्यक्त केली भीती
Just Now!
X