बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ त्यांची कार एका ट्रकला मागून धडकली. या अपघातानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात जाऊन शबाना आझमी यांची भेट घेतली. तर काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या लवकरच ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही ट्विट करुन त्यांच्यासाठी प्रार्थना केली. मात्र तिचं ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं.
“शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात मन विचलित करणारा आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी मी देवाकडे प्रार्थना करते”, असं ट्विट उर्वशीने केलं. मात्र तिचं ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करत पंतप्रधान मोदींना कॉपी केल्याचं म्हटलं आहे.
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— URVASHI RAUTEL (@UrvashiRautela) January 18, 2020
शबाना आझमी जखमी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली होती. “शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात हीच देवाकडे प्रार्थना”, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. अगदी तसंच आणि त्याच मजकूराचं ट्विट उर्वशीने केलं. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं. उर्वशीने हे ट्विट कॉपी-पेस्ट केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
Narendra Modi (@narendramodi) January 18, 2020
Why you copied Mr Modi’s tweet?? You can retweet it!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.Aditya shiv (@imadityashiv) January 18, 2020
Copy paste..from Modi tweet
Hikmatullah Khan (@Hikmatullah806) January 19, 2020
दरम्यान, शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये त्या आणि कारचालक जखमी झाले.