अभिनेता वरूण धवनला करोनाची लागण झाली आहे. ‘जुग जुग जिओ’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वरुणला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. सोशल मीडियावरही एक पोस्ट शेअर करत स्वत: वरुणने करोना झाल्याची माहिती दिली. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तो लवकरात लवकर बरा व्हावा असे म्हटले तर काहींनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण आत वरुणने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.
इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत वरुणने याची माहिती दिली. “करोनाकाळात पुन्हा एकदा कामाला लागल्यानंतर मला करोनाची लागण झाली. निर्मात्यांनी संपूर्ण काळजी घेतली होती. पण, आयुष्यात काय होईल ते सांगता येत नाही. करोनाबद्दल तर मुळात काही सांगता येत नाही. म्हणून कृपया तुम्ही अधिक सावध रहा आणि स्वत:ची काळजी घ्या. मला रोज गेट वेल सुनचे मेसेज येतात आणि ते पाहिल्यावर मी आणखी उत्सफुर्त होतो आणि त्यासाठी धन्यवाद” या आशयाच कॅप्शन वरुणने फोटो शेअर करत दिले आहे.
View this post on Instagram
या पोस्टवरुन त्याला ट्रोल देखील करण्यात आले आहे. एक नेटकऱ्याने “भावा तुला खरच करोना झाला आहे ना? की साध्या खोकल्याची ओव्हर अॅक्टिंग करत आहेस” असे म्हटले आहे.
आणखी वाचा- नीतू कपूर आणि वरून धवन पाठोपाठ क्रिती सेनॉनला करोनाची लागण
वरुणने या ट्रोलर्सला चांगलेच सुनावलेच आहे. ” वाह तू तर खूप मजेदार आहेस. तू किती छान विनोद करतोस. मी आशा करतो की तुला आणि तुझ्या कुटुंबियांना या गोष्टीचा सामना करावा लागणार नाही. पण तुझ्या कुटुंबीयांना अशा विनोदाचा त्रास सहन करावा लागत आहे. या विनोदी वृत्तीतून लवकर बरा हो” असे वरुण कमेंट करत म्हणाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:58 pm