News Flash

देशप्रेमाने भारलेला नवा चित्रपट…विकी कौशल नव्या रुपात!

सोशल मीडियावर शेअर केला टीझर

फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकबद्दल एक व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे. या बायोपिकमध्ये विकी कौशल प्रमुख भूमिका साकारणार आहे. विकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

मेघना गुलजार यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटासाठीचा विकीचा पहिला लूक २०१९मध्ये समोर आला होता. आता या चित्रपटाचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. विकीने हा टीझर शेअर केला आहे. ‘सॅम बहादूर’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

सॅम माणेकशा यांची भारतीय सेनेतली कारकीर्द चार दशकांहून मोठी आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत ५ युद्धात सहभाग घेतला. फिल्ड मार्शल या पदापर्यंत पोहोचलेले ते पहिले लष्कर अधिकारी होते. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता.

एका स्टेटमेंटमध्ये या चित्रपटाच्या दिग्दर्शक मेघना म्हणतात, “आज सॅम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकला नाव मिळालं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मला सॅम यांची गोष्ट रॉनी स्क्रुवाला आणि विकी कौशल यांच्या साथीने प्रेक्षकांसमोर मांडायची संधी मिळाली.”

तर विकी म्हणाला, “मी सॅम यांच्याबद्दल माझ्या आई वडिलांकडून लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण ज्यावेळी मी ही स्क्रिप्ट वाचली, तेव्हा मला कळलं की त्यांचं काम किती मोठं आहे आणि ते खऱ्या अर्थाने देशभक्त होते. त्यांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 1:57 pm

Web Title: vicky kaushal starrer meghana gulzar directorials teaser out vsk 98
Next Stories
1 ‘काही दिग्दर्शकांनी माझ्यासोबत…’, सलमानवर आरोप करणाऱ्या सोमी अलीचा आणखी एक खुलासा
2 ‘अत्यंत घाण भाषेत कलाकार सुद्धा…’, शशांक केतकर ट्रोलरवर संतापला
3 ‘फ्रेंड्स’ पुन्हा येतायत…तेही एका मोठ्या सरप्राईझसह!
Just Now!
X