साऊथ स्टार विजय सेतूपती लवकरच बॉलीवूडमध्ये प्रवेश करत आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यासोबतच अभिनेता विक्रांत मस्सीचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या चाहत्यांना एक सरप्राईझ मिळालं आहे. या दोघांचाही एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाचं पोस्टर आज प्रदर्शित झालं. त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होत आहे. साऊथ स्टार विजय सेतूपतीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पोस्टरमध्ये विजयसोबत विक्रांत, संजय मिश्रा, रणबीर शौरी, सचिन खेडेकर हे कलाकार दिसत आहेत. ‘मुंबईकर’ असं या नव्या चित्रपटाचं नाव आहे. विजयने हे पोस्टर शेअर करतानाच विक्रांतला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून विजय पदार्पण करणार होता मात्र काही कारणाने ते शक्य झालं नाही. ‘मुंबईकर’ हा चित्रपट तमिळ ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘मानगरम’चा रिमेक असणार आहे. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता ज्यात श्री, संदीप किशन आणि रेजिना कॅसान्ड्रा हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.