News Flash

शाहीर शेखच्या मिठीत थरथर कापताना दिसून आली हिना खान; व्हिडीओ होतोय व्हायरल

रोमॅण्टिक सीनसाठी केलं टॉर्चर

(Photo: Instagram@realhinakhan)

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. हिना खान तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर प्रत्येक अपडेट तिच्या फॅन्ससोबत शेअर करत असते. सध्या ती एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिने एक आश्चर्य करणारा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमधून ती स्वतःवर कशा पद्धतीने टॉर्चर होतंय हे दाखवताना दिसून आली. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेता शाहीर शेख सुद्धा दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये हिना खान एका महिलेविषयी बोलताना दिसून आली.

हिना खान आणि शाहीर शेख यांचा आगामी म्यूझिक अल्बम ‘बारिश बन जाना’च्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान थरथर कापताना दिसून आली. फक्त हिना खानच नव्हे तर शाहीर शेखची सुद्धा अवस्था अत्यंत खराब झाल्याची दिसून आली. दोघांची अवस्था पाहून क्रू मेंबर्स त्यांना ब्लॅंकेटने झाकताना दिसून आले. यावेळी हिना खान एका महिलेकडे इशारा करताना दिसून आली. ही महिला तिच्या आगामी अल्बम सॉंगची दिग्दर्शिका आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

रोमॅण्टिक सीन मागची सत्य परिस्थिती सांगितली….
हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्री हिना खानने एक कॅप्शन सुद्धा लिहिली आहे. यात तिने लिहिलं, “अशा प्रकारे सगळ्यात किमान डिग्री तापमानात बर्फाळ पावसात आमच्यावर टॉर्चर झालं आणि इतक्या सुंदरतेने या महिला पूजा सिंह गुजराल यांनी थंड टॉर्चरला ‘बारिश बन जाना’ हे नाव दिलं. मला माहितेय हे पाहणं मनाला सुख देणारं आणि रोमॅण्टिक वाटणारं आहे. पण यासाठी खूप सारी मेहनत आणि प्रयत्न लागतात आणि शेवटला हे प्रयत्न सार्थकी लागतात. हो ना शाहीर शेख…यापुढे आणखी बरेच BTS व्हिडीओज पहायला मिळणार आहेत…रिलीज होतोय येत्या ३ जून रोजी.”

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

अभिनेत्री हिना खान आणि अभिनेता शाहीर शेख यांचा ‘बारिश बन जाना’ हा नवा अल्बम सॉंग भेटीला येतोय. याच गाण्याची शूटिंग काश्मिरमध्ये झाली आहे. या अल्बम सॉंगचा फर्स्ट लूक २९ मे रोजी रिलीज करण्यात आला होता. यात दोघांची घट्ट बॉन्डिंग पाहून त्यांच्या नव्या अल्बम सॉंगसाठी फॅन्स उत्सुक झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 9:32 pm

Web Title: viral news hina khan and shaheer sheikh from the set of baarish ban jana kashmir video viral prp 93
Next Stories
1 करोनावर मात केल्यानंतर कंगना रनौतने कुटूंबासह केलं सुवर्ण मंदिर दर्शन
2 “आता तर मी बेरोजगार आहे…”; लॉकडाउनमध्ये ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख कामाच्या शोधात
3 5G नेटवर्क विरोधात अभिनेत्री जूही चावलाने दिल्ली हायकोर्टात दाखल केली याचिका
Just Now!
X