07 March 2021

News Flash

विराटला आवडतो अनुष्काचा ‘हा’ चित्रपट

विराटदेखील अनुष्काचा चाहता आहे

विराट- अनुष्का

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१७ साली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच विरुष्कादेखील अनेक वेळा जाहीररित्या एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये विराटने अनुष्काच्या आवडणाऱ्या काही गोष्टींविषयी सांगितलं. यामध्येच त्याने अनुष्काचा सर्वाधिक आवडणाऱ्या चित्रपटाचं नावही सांगितलं.

अनुष्काने आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटांना प्रेक्षकांकडून दादही मिळते. त्यामुळेच तिचा चाहतावर्ग अफाट आहे. त्यातच विराटदेखील तिचा चाहता असून त्याला अनुष्काचा एक चित्रपट अफाट आवडतो.

विराटला अनुष्काचा ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रचंड आवडतो. या चित्रपटामध्ये अनुष्काने अभिनेता रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर केली आहे. “या चित्रपटात अनुष्काने केलेला अभिनय आजही माझ्या लक्षात आहे. तिने खूप छान काम केलं होतं”,असं विराटने या मुलाखतीत सांगितलं.
पुढे तो म्हणतो, “या चित्रपटातील एका सीनमध्ये अनुष्काला कॅन्सर झाल्याची माहिती रणबीरला कळते आणि तो सगळं सोडून तिला भेटण्यासाठी येतो. हा सीन अनुष्का अनेक वेळा युट्यूबवर पाहत असते”.

 

View this post on Instagram

 

@indiansportshonours

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

दरम्यान, विराट आणि अनुष्का यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर अनुष्का फार कमी चित्रपटांमध्ये झळकली. अभिनेता शाहरुख खानसोबत तिने झीरो हा चित्रपट केला होता. त्यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही. परंतु आता ती लवकरच एका रोमॅण्टीक चित्रपटामध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 12:25 pm

Web Title: virat kohli reveals anushka sharma favourite movie is ae dil hai mushkil ssj 93
Next Stories
1 मनिष पांडे दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
2 …म्हणून दीपिकाने रणवीरसोबतच्या तीन चित्रपटांना दिला नकार
3 -३ डिग्रीमध्ये बिग बी करतायेत काम; फोटो बघून तुम्हीही द्याल दाद
Just Now!
X