पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, ज्यावेळी संपूर्ण जग करोनाग्रस्त अंधारात चाचपडत होतं तेव्हा भारताने तयार केलेलं एक औषध आशेचा किरण म्हणून समोर आलं. या वक्तव्यावरुन प्रसिद्ध गायक व संगीतकार विशाल दादलानी याने मोदींवर टीका केली आहे. आपण करोनावर औषध शोधलं का? असा प्रश्न त्याने मोदींना विचारला आहे.

अवश्य पाहा – करोनामुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; कमबॅक करण्याआधीच मालिका बंद

नेमकं काय म्हणाला विशाल?

“काय? कुठलं औषध? कोण या औषधाचा प्रचार करत आहे आणि का? आपण करोनावर औषध शोधलं का? मी काहीतरी चुकीचं तर ऐकलं नाही ना?” अशा आशयाचं ट्विट विशालने केलं आहे. नरेंद्र मोदींच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर विशालचे हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य वाचा – “देवा आमच्यावर कृपा कर”; मोदींच्या भाषणाचा अभिनेत्याने घेतला धसका

याशिवाय मोदींनी आपल्या भाषणात २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.