बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. भारतीय जमीन चीनने बळकावली आहे अन् आपले नेते बॉलिवूडवर चर्चा करुन आपली दिशाभूल करत आहेत, अशी टीका त्याने केली आहे.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

नेमकं काय म्हणाला विशाल?

“चीन अजुनही भारताच्या जमीनीवर ठाण मांडून बसलाय. देशातील करोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अन् आपले नेते हे महत्वाचे मुद्दे सोडून बॉलिवूडवर चर्चा करतायत. ही राजकारणी मंडळी आपल्याला मुर्ख बनवत आहेत. पद्धतशीरपणे आपली दिशाभूल करत आहेत.” अशा आशयाचं ट्विट करुन विशालने सरकारवर निशाणा साधला आहे. करोना विशाणूच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य पाहा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक

करोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला ११ लाखांचा टप्पा

भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे. ३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.