News Flash

Haryanvi Song: विश्वजीत चौधरींचा ‘कर्फ्यू’ होतोय व्हायरल; व्हिडीओमध्ये दिसला त्यांचा स्टायलिश अंदाज

युट्यूबवर गाण्याला जबरदस्त शेअरिंग आणि लाईक्स

हरियाणवी गाण्यांची लोकप्रियता सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. प्रत्येक लग्न कार्यात आणि हळदी समारंभात लोक एक तरी हरियाणवी गाण्यांवर ठेका धरतातच. फक्त पंजाब, उत्तर प्रदेशच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा या गाण्यांची क्रेझ वाढतेय. नुकतंच प्रदर्शित झालेलं हरियाणवी गायक विश्वजीत चौधरी यांचं ‘कर्फ्यू’ हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.

‘कर्फ्यू’ या गाण्यात गायक विश्वजीत चौधरी यांचा नवा स्टायलिश अंदाज पहायला मिळतोय. यापुर्वी अनेकदा ‘हरियाणवी डान्सर’ सपना चौधरीसोबत सुपरहीट गाणे देणारे विश्वजीत यंदाच्या नव्या गाण्यात हरियाणवी अभिनेत्री आणि मॉडेल प्रगतीसोबत दिसून आले आहेत. या गाण्यात दोघेही वेस्टर्न लूकमध्ये दिसून येत आहेत. या लूकमध्ये दोघेही स्टायलिश दिसत आहेत. त्यांच्या गाण्याच्या लोकेशनबद्दल सांगायचं झालं तर हे गाणं एका बीचवर शूट करण्यात आलंय. सोबतच या गाण्यात गायक विश्वजीत चौधरी यांनी एक रॅप ही गायलं आहे. हे गाणं ११ मे रोजी प्रदर्शित करण्यात आलंय.

हरियाणवी गायक विश्वजीत चौधरी यांनी यापुर्वी ‘गजबन पानी’, ‘मिलकी’ यासारखे सुपरहीट गाणे दिले आहेत. त्यांच्या या दोन्ही गाण्यांमध्ये सपना चौधरीने देखील त्यांच्यासोबत जबरदस्त डान्स केलाय. याअगोदर विश्वजीत यांचं ‘खुडका’ हे देखील गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. लोकांनी या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. या गाण्यात त्यांच्यासोबत टीव्ही इंडस्ट्रीतील ‘छोटी सरदारनी’ मेहर गिल दिसून आली. या गाण्याला यूट्यूबवर लाखो व्ह्यूव्स मिळाले होते.

गायक विश्वजीत चौधरी यांनी हरियाणवी संगीत क्षेत्रात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्याला लोक पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी पसंती देत असतात. त्यांच्या कर्फ्यू या नव्या गाण्याला युट्यूबवर जबरदस्त शेअरिंग आणि लाईक्स मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:52 pm

Web Title: vishwajeet chaudhary new haryanvi song curfew released video goes viral on social media prp 93
Next Stories
1 वाढत्या वयामुळे होणाऱ्या बदलांबद्दल प्रियांका म्हणते….
2 ‘ज्याच्यासोबत घडते, तोच समजू शकतो’, ‘गोगी’ने वाहिली टप्पूच्या वडिलांना श्रद्धांजली
3 KKK11 : श्नेता तिवारीने फ्लॉंट केले एब्ज ; अर्जुन बिजलानी म्हणाला, कोणत्या च्यवनप्राशची जादू आहे ?
Just Now!
X