News Flash

काय आहे ‘बेला चाओ’ या गाण्याचा अर्थ ? संपूर्ण देशाला पडलाय प्रश्न, पाहा Google ची आकडेवारी

'मनी हाइस्ट' सीरिजचा पाचवा सिझन प्रदर्शित होताच सुपरहिट. बेला चाओ गण्याचा अर्थ शोधत आहेत भारतीय प्रेक्षक.

money-hiest
(Photo-Loksatta File Images)

‘मनी हाइस्ट’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सीरिजचा पाचव्या सिझनचा पहिला खंड आज प्रदर्शित झाला. या सीरिजचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. भारतात ही या सीरिजची प्रचंड प्रमाणात क्रेझ आहे. आज दुपारी १२.३० वाजता ही स्पॅनिश सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली. ही सीरिज प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.  भारतीय प्रेक्षक गुगल करून या सीरिज बद्दल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या सीरिज इतकच याच एंथम ‘बेला चाओ’हे गाणे देखील लोकप्रिय आहे. सध्या गुगल ट्रेंडमध्ये ‘मनी हाईस्ट’च एंथम ‘बेला चाओ’ या गाण्याचा नेमका अर्थ काय आहे? हे प्रेक्षक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘बेला चाओ’ गाणं ‘मनी हाइस्ट’च्या पहिल्या सिझनमध्ये रॉयल मिंट ऑफ स्पेनच्या चोरीच्या दरम्यान पहिल्यांदा तुम्हाला ऐकायला येतं. नंतर वेगवेगळ्या प्रसंगाला हे गाणं पार्श्वभूमीवर ऐकायला येते. हे गाण्यात प्रोफेसर कोणत्या ही गोष्टीला विरोध कसा करायचा हे शिकवतात. “बेला चाओ हे गाणं प्रोफेसरच्या आजोबांनी त्याला शिकवले , ज्यांनी इटलीमध्ये फॅसिस्टांविरोधात लढा दिला होता, आणि नंतर प्रोफेसरने या चोरांच्या टोळीला.” असे टोकियोची भूमिका साकारणारया उर्सुला कोबेरो हिने एका मुलाखतीत सांगितले होते.  ‘बेला चाओ’ या गाणं इतक लोकप्रिय आहे की नंतर  याच्या अनेक आवृत्ती आल्या.

bella-ciao-meaning

असं म्हटल जात की उत्तर इटलीमध्ये गरीब महिलांना जबरदस्तीने कमी पगारात काम करायला लावायचे.  त्यांच्याकडे कोणत्या ही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. इटलीतील महिलांना खुप त्रास सहन करायला लागायचा आणि म्हणून त्यांनी बेला चाओ हे गाणं तयार केलं. या गाण्याचा अर्थ “खुप त्रास आहे, पण तो दिवस येईल जेव्हा आपण सर्वजण स्वातंत्र्यात काम करू” असा आहे. कालांतरानी, बेला चाओ हे इटालियन लोकगीत ठरलं, जे फॅसिस्ट लोकांच्या विरोधात राष्ट्रगीत म्हणून वापरले गेले आणि जगभरात गायले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2021 7:20 pm

Web Title: what is meaning of bella ciao song from popular netflix s series money heist aad 97
Next Stories
1 आई कुठे काय करते : ‘या घरात राहण्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही’, अरुंधतीने दिले संजनाला सडेतोड उत्तर
2 घरगुती हिंसाचार प्रकरण : न्यायालयात पोहचला हनी सिंग; महिला दंडाधिकाऱ्यांनी दिला इशारा, “पुन्हा वाद झाल्यास…”
3 Video: तुमचं नाव काय? असं विचारणाऱ्याला साराने दिलेलं उत्तर पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक
Just Now!
X