27 February 2021

News Flash

सोशल मीडियावरील सर्व पोस्ट केले डिलीट; सुशांतला नेमकं झालंय तरी काय?

गेल्या काही दिवसांत त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून एक वेगळीच गोष्ट लक्षात आली.

सुशांत सिंह राजपूत

‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ फेम सुशांत सिंग राजपूत सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. आपल्या चित्रपटांचे अपडेट्स देणं असो, फोटो असो किंवा इतर बऱ्याच गोष्टी सुशांत चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र गेल्या काही दिवसांत त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून एक वेगळीच गोष्ट लक्षात आली.

सोशल मीडियावर हजारो फॅन- फॉलोईंग असलेला सुशांत गेल्या काही आठवड्यांपासून अचानक काही गंभीर पोस्ट शेअर करू लागला. रोजच्या घडामोडींविषयी सोडून तो विज्ञान-भौतिकशास्त्र आणि खगोलभौतिक यांसंदर्भातले पोस्ट टाकू लागला. यावर बऱ्याच चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले तर काहींनी हे पोस्ट समजण्यापलीकडे असल्याची तक्रारदेखील केली.

वाचा : आलियाला घसघशीत मानधन देण्यासाठी निर्माते होणार ‘राजी’?

काही दिवस विज्ञान- भौतिकशास्त्राबद्दल पोस्ट केल्यानंतर त्याने सर्व पोस्ट अचानकपणे डिलीटसुद्धा केले. आठवड्याभरापूर्वी हे सर्व पोस्ट डिलीट करून त्याने पुन्हा नव्याने इन्स्टाग्रामवर १०-१२ फोटो टाकले. हे नव्याने पोस्ट केलेल फोटोसुद्धा त्याने पुन्हा डिलीट केले. सुशांतच्या अशा वागण्याने नेटकरी पेचात पडले आहेत. त्याला नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावू लागला. सोशल मीडियावरील सुशांतच्या अशा विचित्र वागण्याचं कारण मात्र तोच सांगू शकतो. त्यामुळे येत्या काळात तो यावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 9:29 am

Web Title: whats cooking sushant singh rajput deletes his social media posts again
Next Stories
1 बॉलिवूड कलाकारांपेक्षाही जास्त कमावतात ‘हे’ टेलिव्हिजन सेलिब्रिटी
2 सुनील दत्त यांनी लिहिलेलं पत्र आणि ‘संजू’चा योगायोग
3 फ्लॅशबॅक : सौतन की सौतन…
Just Now!
X