News Flash

…जेव्हा रणबीर दीपिकाला म्हणाला, ‘आजही करतो प्रेम’

तिच्यासोबत असल्यावर घरातल्यांसोबत असल्याचे वाटते. ती घरातल्यांची उणीव भासू देत नाही

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचे नाव सध्या आलिया भट्टशी जोडले जात आहे. पण एकेकाळी रणबीर दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण नंतर दोघांच्या नात्यात कटुता आली आणि दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर रणबीरने हे मान्य केले की तो आजही दीपिकाच्या प्रेमात आहे. सोशल मीडियावर दीपिका आणि रणबीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर सर्वांसमोर तो आजही दीपिकाच्या प्रेमात असल्याची कबूली देताना दिसत आहे. ‘स्पॉटबॉय’ या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये रणबीरला प्रश्न विचारण्यात आला की, ‘तू म्हणाला होतास की दीपिका फ्लर्ट आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, माझ्या ये जवानी है दिवानी सिनेमात मी सांगितलं आहे की फ्लर्ट हे आरोग्यासाठी चांगले असते. फ्लर्ट करणे हे योग करण्यासारखे आहे. पण मी असं कधीच बोललो नाही की दीपिका फ्लर्ट आहे. हे वाक्य मस्करीमध्ये होते, त्यामुळे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका.’

यानंतर रणबीरला दुसरा प्रश्न विचारला की रणबीरला दीपिकाजवळ येणं म्हणजे डाळ- भातासारखं का वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. माझ्या बोलण्याचा अर्थ होता की, मला दीपिकासोबत काम करताना फार मोकळं वाटतं. तिच्यासोबत काम करताना माझ्यावर कोणते दडपण नसते आणि मजाही येते. डाळ- भाताचा अर्थ लावायचा तर तिच्यासोबत असल्यावर घरातल्यांसोबत असल्याचे वाटते. ती घरातल्यांची उणीव भासू देत नाही. माझ्या या वक्तव्याची बातमी मी जेव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचली तेव्हा मला फार धक्का बसला होता.’

यानंतर दीपिकाला ती अजूनही रणबीरच्या प्रेमात आहे का असा प्रश्न विचारला असता हा प्रश्न रणबीरलाही विचारावा असे तिने पत्रकारांना सांगितले. या प्रश्नाचे उत्तर देताना रणबीर म्हणाला की, ‘हो मी आजही तिच्यावर प्रेम करतो. कारण मी तिचा द्वेष करु शकत नाही. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी असं तर म्हटलं नाही की तिच्यावर माझं प्रेम हे प्रेमापेक्षा थोडं जास्त आणि प्रेमापेक्षा थोडं कमी आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 9:19 pm

Web Title: when ranbir kapoor said that even today love has become red with shy deepika padukone
Next Stories
1 Raazi Movie Collection Day 7: ‘राजी’ची घौडदौड सुरूच… सात दिवसांत केली एवढ्या कोटींची कमाई
2 सोनम कपूरने केले रणवीर- दीपिकाच्या लग्नावर शिक्कामोर्तब?
3 बॉबी डार्लिंगचा नवरा गजाआड, अनैसर्गिक सेक्स आणि मारहाणीचा आरोप
Just Now!
X