बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या. खरंतर सलमानचे नाव सगळ्याच अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. तर सलमानला त्याच्या खऱ्या रिलेशनशिपमध्येही अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याच्या रिलेशनशिपमधला असात एक मजेदार किस्सा सलमानने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सांगितला होता.

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये एकदा सलमानने हा किस्सा सांगितला होता. जेव्हा तो १८ वर्षांचा होता, तेव्हा तो दोन मुलींसोबत एकत्र रिलेशनशिपमध्ये होता. तर स्वत: चेहरा बदलण्यासाठी त्याने खोटे दात वापरले होते असे त्याने सांगितले. ‘मी खूप दिवसांपासून कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होतो, पण आम्ही त्या रिलेशनशिपला गांभिर्यांने घेतले नव्हते, म्हणून मी दुसऱ्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आम्ही १७-१८ वर्षांचे होतो. त्यावेळी मला वाटले की माझ्या आताच्या गर्लफ्रेंडला हे कळाले तर तिला वाईट वाटेल. यासाठी मी एक युक्ती लावली. माझे काका दंतचिकित्सक आहेत, मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून मी खोटे दात बनवून घेतले,’ असे सलमानने सांगितले.

आणखी वाचा : गणेशोत्सवात अबरामचा गणपती बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे शाहरूख झाला होता ट्रोल

सलमानला वाटलं की आता जर तो खोटे दात लावून गेला तर त्यांची गर्लफ्रेंड त्याला ओळखू शकणार नाही. जेव्हा खोटे दात लावून सलमान त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेला तेव्हा त्याची सध्याची गर्लफ्रेंड आधीच तिथे होती. सलमानला पाहताच तिने त्याला ओळखून घेतले आणि त्याच्या दातांना काय झाले हे विचारले, हे ऐकून सलमानला भीती वाटली. त्याने लावलेली युक्ती फसली. पण सध्याच्या गर्लफ्रेंडने सलमानला पकडल्यानंतर त्याने तिला सगळं काही खरं सांगितलं. सलमानचा हा किस्सा ऐकून शोमध्ये उपस्थित असलेले सगळे लोक हसू लागतात.

आणखी वाचा : संजय दत्तला कॉलेजला जाण्यासाठी वडिलांनी गाडी नाही तर दिला होता रेल्वेचा सेकेंड क्लासचा पास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान सध्या ‘टायरग ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सध्या तुर्कीमध्ये सुरु आहे. यासोबत लवकरच सलमान छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १५’ चे सुत्रसंचालन करताना दिसणार आहे.