News Flash

प्रियंका-निकचा बेडरुममधील ‘तो’ फोटो काढणारा कोण?, नेटकरी झाले सैराट

नेटकरीच घेत आहेत या फोटोग्राफरचा शोध

फोटो काढणारा कोण?

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाला काही महिने उलटून गेले. जोधपूर येथे पार पडलेल्या शाही लग्नसोहळ्यातील अनेक फोटो दोघांनी नंतर सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले. आता दोघेही अमेरिकेत राहत असून अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.असाच एक फोटो प्रियंकाने नुकताच आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन शेअर केला. पती निकच्या छातीवर डोकं ठेऊन झोपलेला हा फोटो शेअर करताना प्रियंकाने ‘होम’ अशा एका शब्दाचे डिस्क्रीप्शन दिले आहे.

या फोटोला हजारो रिट्वीस आणि लाखो लाइक्स मिळाले आहेत. पण खरी गंमत त्यानंतर सुरु झाली. प्रियंका घरामध्ये नवऱ्याबरोबर आराम करत असताना त्यांचा हा फोटो कोणी काढला असा प्रश्न नेटकऱ्यांना सतावत आहे. अनेकांनी प्रियंकाच्या या फोटोखाली या फोटोचा फोटोग्राफर कोण अशा आशयाच्या कमेन्ट केल्या आहेत. तर अनेकांनी यावरुन प्रियंका आणि निकची फिरकी घेतली आहे. पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे या फोटोबद्दल…

फोटो काढणारा तिसरा माणूस कोण?

फोटोग्राफर घरीच राहतो का?

हो, हा आहे फोटोग्राफर

अनेकजण तर अगदी गुप्तहेर असल्यासारखे या फोटोवर तुटून पडले आणि फोटोग्राफरचा शोध घेऊ लागले. म्हणजेच हा फोटो नक्की कोणी काढला असेल याबद्दलचे तर्कवितर्क लावले गेले.

सीसीटीव्ही फुटेज आहे का हे?

जॉन सिनाने काढलाय फोटो

की अॅलेक्साने?

मांजरीने?

विराट अनुष्काच्या फोटोग्राफरने

कामवाली

पीआरवाल्याने काढला फोटो?

अदृष्य व्यक्तीने?

या फोटोखाली अनेकांनी हाच प्रश्न उपस्थित केला असला तरी हा फोटो कसा काढला असेल याचं उत्तरही एका व्यक्तीने दिले आहे.

आता खरोखरच हा फोटो कसा काढला हे फक्त फोटोतील दोन्ही व्यक्तीच सांगू शकता. असं असलं तरी या फोटोमुळे नेटकऱ्यांचे चांगले मनोरंजन झाले हे मात्र खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 6:02 pm

Web Title: who clicked this mysterious photo of priyanka chopra and nick twitter wants to know
Next Stories
1 अक्षय कुमारला भेटण्यासाठी चाहता बंगल्यात घुसला आणि….
2 नक्की चुकतंय कोण? पालक की मुलं?
3 पुस्तक आणि पुलंच्या निमित्ताने प्रिमियरमध्ये होता येणार सहभागी
Just Now!
X