12 November 2019

News Flash

फडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले

जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो देते. या शोचं अकरावं पर्व सध्या फार चर्चेत आहे. स्पर्धकांच्या आयुष्यातील किस्से, त्यांनी केलेली मेहनत, त्यांच्या गोष्टी ऐकण्यात सूत्रसंचालक अमिताभ बच्चन दंग होऊन जातात. अनेकदा स्पर्धक मोठ्या रकमेपर्यंत पोहोचतात पण चुकीचं उत्तर दिल्याने त्यांना अत्यंत छोटी रक्कम घरी नेता येते. असाच एक प्रसंग नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळाला.

चांदनी मोदी या उपतहसीलदार हॉटसीटवर बसल्या होत्या. प्रश्नांची उत्तरं त्या आत्मविश्वासाने देत होत्या. २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत त्यांनी मजल मारली होती. पण तोपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या चारही लाइफलाइन वापरुन झाल्या होत्या. २५ लाख रुपयांसाठी बिग बींनी प्रश्न विचारला, ”महाराष्ट्राचे आतापर्यंत सर्वांत तरुण मुख्यमंत्री कोण आहेत?” या प्रश्नावर बराच विचार केल्यानंतर चांदनी यांनी देवेंद्र फडणवीस हे उत्तर सांगितलं. पण हे चुकीचं उत्तर असल्याने चांदनी यांनी जिंकलेली रक्कम २५ लाखांवरुन थेट ३ लाख २० हजारांवर आली. या प्रश्नाचं अचूक उत्तर शरद पवार हे होतं. चुकीच्या उत्तरामुळे चांदनी मोदी यांना मोठी रक्कम जिंकता आली नाही.

First Published on October 23, 2019 5:50 pm

Web Title: who is the youngest cm of maharashtra was asked in kbc 11 ssv 92