News Flash

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनुष्काने शेअर केला वामिकासोबतचा खास फोटो

पाहा फोटो

(Photo credit : anushka sharma instagram)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील निवृत्त कर्नल अजय शर्मा यांचा काल ६० वा वाढदिवसा होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यात अनुष्काने अनेक फोटो शेअर केले होते. त्यातील एका फोटोत विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका दिसत आहे. हे सर्व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने अनेक फोटो शेअर केले आहेत. भारतीय सैन्यातील तिच्या वडिलांचे दिवस, छोट्या अनुष्का सोबतचा फोटो, विराट आणि अनुष्काच्या लग्नातील फोटो आणि सगळ्यात खास फोटो म्हणजे वामिका सोबतचा फोटो अनुष्काने शेअर केला आहे. या फोटोत अजय शर्मा हे वामिकाला हातात घेऊन फिरवत आहेत. “माझे वडील- १९६१ मधील स्पेशल एडिशनचा आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहोत. आम्ही मोठे होत असताना प्रामाणिकपणा, चांगुलपणा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न देता शांत राहण्याचा नेहमीच प्रयत्न करा असे त्यांनी आम्हाला शिकवले. मला त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रेरणा मिळाली. त्यांनी मला जेवढा पाठिंबा दिला आहे त्याची मी परतफेड करू शकणार नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. तुम्हाला ६० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.” अशा आशयाचे कॅप्शन अनुष्काने त्या पोस्टला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

वनडे मालिकेत विराट खेळणार असल्याने अनुष्का आणि वामिका दोघेही त्याच्या सोबत पुण्यात आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांचा वामिका सोबतचा फोटो  आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 10:13 am

Web Title: you just cannot miss this picture of vamika along with her grandfather dcp 98
Next Stories
1 “बिकनी अ‍ॅण्ड बिंदी”; प्रियांका चोप्राच्या फोटोचा सोशल मीडियावर धुमाकुळ
2 मिलिंद सोमणला करोनाची लागण; बॉलिवूडवर करोनाचं सावट
3 कंगना राणावतला अटकपूर्व जामीन मंजूर
Just Now!
X