भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे हनीमूनसाठी दुबई गेले आहेत. ते सोशल मीडियावर तेथील व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसत आहेत. आता देखील युजवेंद्रने धनश्रीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे रोमँटिंक अंदाजात दिसत आहेत.
नुकताच युजवेंद्रच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही रोमँटिंक अंदाजात दिसत आहेत. व्हिडीओमध्ये धनश्रीने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर युजवेंद्रने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ जवळपास १ लाख २२ हजार लोकांनी पाहिला आहे.
View this post on Instagram
धनश्री आणि युजवेंद्रने २२ डिसेंबर रोजी लग्न केले. गुरुग्राममधील कर्मा लेक रिसॉर्टमध्ये चहल आणि धनश्रीचा पारंपरिक हिंदू रिवाजाप्रमाणे विवाहसोहळा पार पडला. चहलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही गोड बातमी दिली होती. धनश्री ही कोरिओग्राफर असून लॉकडाउनच्या काळात दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाले आणि चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली होती. आयपीएलदरम्यान धनश्री चहलला पाठींबा देण्यासाठी युएईत दाखल झाली होती.