आमिर खान आणि जिनिलीया देशमुख अभिनीत ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा ट्रेलर बऱ्याच काळानंतर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लोक पुन्हा एकदा आमिर खानचे चाहते झाले आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर लोक त्याचे खूप कौतुक करताना दिसले.

काही लोकांना आमिर खानची नवीन स्टाईल आवडत आहे; तर काहींना नवीन स्टारकास्टकडे आकर्षित केले जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेली स्टोरी लोकांची मने जिंकत आहे. ‘सितारे जमीन पर’ चा ट्रेलर ‘आमिर खान टॉकीज’ नावाच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झाला आहे. वापरकर्त्यांना ट्रेलर खूप आवडला आहे. ट्रेलरवर १४ हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित होणार होता पण भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. ‘सितारे जमीन पर’ हा 2007 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. आमिर खानचे कौतुक देखील केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘दिग्गज बॉली वूडला पुढे घेऊन जात आहेत. खूप छान ट्रेलर. दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट परत आला आहे.’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘जिनिलीया परत आली आहे.’ तिचा गोंडसपणा पूर्वीसारखाच आहे’.

Aamir Khan
आमिर खान (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

आमिर खान प्रोडक्शन्स ‘सितारे जमीन पर’ या सिनेमाद्वारे १० नवोदित कलाकारांना लॉन्च करत आहे .अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाचे निर्माते आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका हे आहेत. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.