बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्याबरोबर काम केलेली अभिनेत्री लैला खान आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. तिच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. अभिनेत्रीने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबरोबर एका चित्रपटात स्क्रीन शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
वयाने लहान असूनही तिला राजेश खन्ना यांच्याबरोबर इंटिमेट सीन्स करावे लागले. लैला खानचे वैयक्तिक आयुष्य खूप वेदनादायक होते. अभिनेत्रीला जिवंतपणी ओळख मिळाली नाही, परंतु तिच्या मृत्यूनंतर ती प्रसिद्धीझोतात आली.
२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वफा : द डेडली लव्ह स्टोरी’या चित्रपटात राजेश खन्ना आणि लैला खान मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात राजेश खन्ना यांचे लैला खानबरोबर अनेक इंटिमेट सीन्स होते, ज्यामुळे लोक थक्क झाले.
हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण राजेश खन्ना यांना त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर असे चित्रपट केल्याबद्दल खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. राजेश खन्ना यांच्याबरोबर बोल्ड सीन्स देऊन लैला खानला थोडीफार ओळख मिळाली, पण तिचा करिअरचा प्रवास फारसा पुढे जाऊ शकला नाही. त्या वेळी राजेश खन्ना यांचे वय 66 वर्षे होते तर लैला खान त्यांच्यापेक्षा तब्बल 36 वर्षांनी लहान होती.
लैला खानने चित्रपटानंतर काही काळातच सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला. तिने बॅन टेररिझम ग्रुपशी संबंधित असलेल्या मुनीर खानबरोबर लग्न केले. या लग्नामुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली होती.
लैला खान २०११ मध्ये कुटुंबासह इगतपुरी येथे सुट्टीसाठी गेली होती, पण बराच वेळ उलटूनही तिची कोणतीही बातमी आली नाही. विशेष म्हणजे सुट्टीवर जाण्यापूर्वी तिने अनेक चित्रपट साइन केले होते आणि फी घेतली होती. अशा परिस्थितीत अनेक निर्मातेही काळजीत पडले होते. अनेकांना असे वाटू लागले की ती पैसे घेऊन पळून गेली आहे.
काही महिन्यांनंतर पोलिसांना लैला खान, तिची आई, तीन भावंडे आणि एक चुलत भाऊ-बहीण – अशा एकूण पाच जणांचे मृतदेह मिळाले. या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले. लैला खानच्या सावत्र वडिलांनीच संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती हे समोर आले. या अमानुष हत्याकांडासाठी अखेर दीर्घ सुनावणीनंतर २०२४ मध्ये लैला खानच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.