संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील ९४ कलाकरांना हा पुसरस्कार जाहीर करण्यात आला होता. काल बुधवारी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सात कलाकारांना संगीत नाटक अकादमी फेलो पुरस्कार

प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सुनैना हजारी लाल, प्रसिद्ध नाटककार दया प्रकाश सिन्हा, कुचिपुडी नृत्यांगना राजा रेड्डी, राधा रेड्डी यांच्यासह सात कलाकारांना २०२२ च्या संगीत नाटक अकादमी फेलो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तीन लाख रुपये, ताम्रपट व अंगवस्त्र, असे पुसस्काराचे स्वरूप होते.

हेही वाचा- “मला पटवण्यापुरतं त्यानं…”, उदय टिकेकर व आरती अंकलीकर यांची ‘अशी’ झाली भेट, गायिका म्हणाल्या…

महाराष्ट्रातून ‘या’ कलाकांना मिळाला पुरस्कार

२०२२ मधील शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना, तर २०२३ साठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी अशोक सराफ यांना २०२२ या वर्षासाठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २०२३ या वर्षासाठीचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षातील मानाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा- “आम्ही दोघंही महाराष्ट्राच्या जनतेचे…”, अशोक सराफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान; पत्नी निवेदिता यांनी शेअर केला खास व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कलाकारांना प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. या समारंभाला सांस्कृतिक व पर्यटनमंत्री जी. कृष्णा रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष संध्या पुरेचा आदी मान्यवर उपस्थित होते.