scorecardresearch

आमिर खानचा सॅन फ्रान्सिस्कोमधील फॅनबरोबरचा सेल्फी व्हायरल, ‘परफेक्शनिस्ट’ पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे आमिर खानने काही दिवस विश्रांती घ्यायचे ठरवले आहे.

आमिर खानचा सॅन फ्रान्सिस्कोमधील फॅनबरोबरचा सेल्फी व्हायरल, ‘परफेक्शनिस्ट’ पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर
आमिर खान सेल्फी | aamir khan viral selfie

आमिर खान बॉलिवूडचा ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. त्याचे ‘दंगल’, ‘३ इडियट्स’, ‘लगान’, ‘रंग दे बसंती’, ‘गजनी’ असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. समीक्षकांसह प्रेक्षकांना देखील त्याच्या बऱ्याच सिनेमांचे कौतुक केले आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदा ऑनस्क्रीन दिसले. असे असले तरी अनेक कमतरतांमुळे हा चित्रपट लोकांना आवडला नाही. या चित्रपटानंतर आमिरने चार वर्षांचा ब्रेक घेतला.

गेल्या काही वर्षांपासून आमिर खान एका वर्षी एकच चित्रपट करतो असं म्हटलं जात होतं. तब्बल चार वर्षांनंतर त्याचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या महिन्याभरापूर्वी आमिरच्या वैयक्तिक आयुष्यात काही घटना घडल्या. त्या घटनांचा नकारात्मक प्रभाव आमिरच्या प्रतिभेवर पडला. त्याला ट्रोल केले गेले.

आणखी वाचा : Video : बहिण अर्पिताच्या घरी सलमान खानने केली बाप्पाची आरती

पुढे चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी त्याला भूतकाळातील विधानांवरुन पुन्हा ट्रोल्सचा सामना करावा लागला. यातून सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ असा ट्रेंड सुरू झाला. एकूण परिस्थितीचा प्रभाव चित्रपटाच्या कमाईवर झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खानने कोणतेही मानधन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लाल सिंग चड्ढा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडच्या सुपरहिट सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा बनवण्यासाठी आमिर खान आणि त्याची टीम बरेच वर्ष मेहनत घेत होती. त्यांनी फॉरेस्ट गंपच्या निर्मात्यांकडून अधिकृत हक्क मिळवून लाल सिंग चड्ढा तयार केला आहे. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे आमिर खानने काही दिवस विश्रांती घ्यायचे ठरवले आहे. तो सध्या अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्को शहरात फिरत असताना नताशा नावाची एक भारतीय फॅन आमिरला भेटली. नताशाने आमिरसोबतचा सेल्फी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोला नताशाने ‘मी कालच्या अनपेक्षित अविश्वसनीय क्षणांमधून अजून बाहेर आलेले नाही.’ असे कॅप्शन दिले आहे.

भेटीदरम्यान नताशाने आमिरला ‘तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये काय करत आहात?’ असे विचारले. त्यावर त्याने हसत ‘सहज फिरतोय.’ असे म्हटले. तिने पोस्ट केलेला आमिरसोबतचा सेल्फी खूप व्हायरल झाला आहे. या फोटोला खूप लाईक्स मिळाले आहेत. फोटोला काहीजणांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी आमिरला पुन्हा ट्रोल केले आहे. दोन-तीन महिन्यांनंतर त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A fan took a selfie with actor aamir khan gets viral on social media netizens started trolling avn

ताज्या बातम्या