छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील परीची भूमिका साकारणारी सगळ्यांची लाडकी बाल कलाकार मायरा वायकुळने सगळ्यांची मने जिंकली आहेत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मायराच्या घरी एक नवीन गाडी आली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मायरा आणि गाडीचे हे फोटो तिच्या आईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मायराचे आई – वडील श्वेता आणि गौरव वायकुळ यांनी नुकतीच एक इलेक्ट्रॉनिक कार खरेदी केलीय. हे फोटो शेअर करत मायराच्या आईने ‘१ जून १९६० हा नंबर नेहमी आम्हाला खूप कष्ट करण्याचा उत्साह देईल. मिस यु पापा’, असे कॅप्शन दिले आहे. मायराचा स्टाइलिश लूक या व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दिसत आहे. या गाडीची किंमत १७ लाख रुपयांच्या जवळपास आहे.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. लहान मुलांची निरागसता, प्रेमळ स्वभाव अनेकांच्या मनावर जादू करतात ते या मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं आहे. तर ही चिमुकली मायरा फक्त चार वर्षांची आहे.