A R Rahman Birthday: आपल्या संगीताने आणि गायकेने जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घालणारे संगीतकार-गायक ए आर रेहमान यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी विविध भाषांमधील गाणी करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाप त्यांच्या गाण्यांमधून पाहायला मिळतो. त्यांनी ऑस्कर पुरस्कारवरही स्वतःचे नाव कोरले आहे. जगभरातील आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचं नाव सामील आहे. तर एका चित्रपटाच्या गाण्यासाठी ते काही कोटी आकारतात.

ए आर रेहमान यांनी त्यांच्या संगीताने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहेच पण त्याचप्रमाणे इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड संपत्तीही कमावली आहे. एका गाण्यासाठी सर्वात जास्त मानधन आकारणाऱ्या गायक-संगीतकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. एका गाण्यासाठी काही कोटी आकारणारे ए आर रेहमान लाईव्ह कॉन्सर्टच्या वेळीही एका तासासाठी आकारत असलेल्या मानधनाचा आकडा कोटींच्या घरात आहे.

आणखी वाचा : A R Rahman Birthday: जन्माने हिंदू असलेल्या एआर रेहमान यांनी का स्वीकारला होता इस्लाम धर्म? जाणून घ्या

हेही वाचा : IPL 2022: एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले “वंदे मातरम्”, अंगावर काटा आणणारा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्टनुसार ए आर रेहमान हे २०५० कोटी संपत्तीचे मालक आहेत. ते एका चित्रपटात गाणी संगीतबद्ध करण्यासाठी आणि गाण्यासाठी १० कोटी रुपये आकारतात. त्याचप्रमाणे एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी ते तासाला ३ ते ५ कोटी आकारतात. ८ कोटींच्या गाड्या, १०० कोटींची इन्व्हेस्टमेंट, ५० हून अधिक कोटींचे आलिशान फ्लॅट, कोट्यवधींचे म्युझिक स्टुडिओ आणि इन्स्टिट्यूट अशी त्यांची संपत्ती आहे.