‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. ही मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. आता मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एण्ट्री होणार आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत एका बाजूला अरुंधतीने घराचा काही हिस्सा गहाण ठेवल्याचे देशमुख कुटुंबाला समजते. तर दुसरीकडे अरुंधतीचा मुलगा यश हा कामानिमित्त १० दिवस बाहेरगावी जाणार असल्याचे दाखवलं जात आहे. तर दुसरीकडे अविनाशची पैशांची अडचण सोडवण्यासाठी अरुंधतीने अप्पांच्या मदतीने समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशची अडचण दूर केली. सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या सर्वांच्या प्रश्नाला अरुंधती कशी सामोरी जाणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

आणखी वाचा : “यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय…,लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माधुरीचे पती डॉक्टर नेनेंनी जेव्हा बिग बींना पाहिलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अविनाशला मदत करण्याच्या नादात अरुंधती अडचणीत सापडली आहे. तर, मालिका एका नव्या वळनावर पोहोचली आहे. मालिकेत अरुंधतीच्या एका मित्राची एण्ट्री होणार आहे. अरुंधतीच्या या मित्राची भूमिका कोण साकारणार आहे, याबाबत आता पर्यंत काही खुलासा झालेला नाही. परंतु ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारत असल्याची चर्चा सुरु आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात येणारा हा नवीन मित्र वादळ घेऊन येतो की तिला आधार देतो हे मालिकेच्या आगामी भागांतून स्पष्ट होणार आहे.