छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो हा व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहितो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंदने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने अनिरुद्ध या त्याच्या भूमिकेविषयी सांगितले आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर मिलिंदने दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

ही पोस्ट शेअर करत, “आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का? अनिरुद्ध देशमुख एकामागे एका मागे एक चुका करत चाललाय,बारा-तेरा वर्षापूर्वी त्याच्या आयुष्याचं गणित चुकलं. त्याच्याकडून एक चूक झाली, ती अनिरुद्धला सुधारता आली असती का? आली असती तर अनिरुद्ध सारखा सुखी माणूस कोणीच नसता आणि त्याच्याबरोबर त्याचा परिवार ही सुखी राहिला असता. असं म्हणतात ना की एक खोटं लपवण्यासाठी १०० वेळा खोटे बोलावे लागते. तसंच आयुष्यात एक मोठी चूक केली की त्याच्या मागे तुम्ही शंभर चुका करत राहता. वेळीस जर ती चूक कबूल करून सुधारली नाही तर आयुष्याची फडफड होऊ शकते”, असे मिलिंद म्हणाला.

आणखी वाचा : अभिनेता आर माधवनच्या मुलाने महाराष्ट्रासाठी जिंकली ७ पदक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे मिलिंद म्हणाला, “फक्त त्याची स्वतःची नाही तर त्याच्याबरोबर जोडलेल्या त्याच्या नातेवाईकांची मित्रमंडळींची स्वकीयांची सगळ्यांची, किती घरांमध्ये हीच परिस्थिती आहे, मनं दुखावली जातात, काहींमध्ये अहंकार असतो, दुसऱ्यांचा विचार करत नाहीत, लोकं स्वार्थी होतात, आणि मग त्याच्यावर एकच उपाय. तो उपाय म्हणजे, त्यापेक्षा आपण वेगळे राहूया आणि लोक वेगळी होतात. त्यात सगळ्यांचं नुकसान होतं. बऱ्याच वेळा लोकांना कळतं नाही, एकत्र कुटुंबा सारखं सुख या जगामध्ये कुठेच नाही. आई-वडील, आजी-आजोबा, मुली, सुना, नातवंड, काका, मावशी, आत्या, मामा आणि काही अतिशय जवळची मित्रमंडळी, हल्ली दिवाळीला सुद्धा एकत्र येत नाहीत. हे सगळं बदलेल का? येतील का लोक परत एकत्र छान सण साजरा करायला. दुरावलेली माणसं परत एकत्र आली किती मजा येईल. अनिरुद्ध देशमुख सुधारला तर किती मजा येईल? डोळे उघडतील का त्याचे?”