प्रत्येक सिनेमात काही तरी नवीन करण्यासाठी आमिर खान नेहमीच मेहनत घेताना दिसतो. दंगल सिनेमासाठी त्याने आपल्या शरिरयष्ठीवर घेतलेली मेहनत तर सगळ्यांनीच पाहिली. काही दिवसांपूर्वी त्याचा असाच एक लूक व्हायरल झाला होता. त्याचा हा लूक ‘सिक्रेट सुपरस्टार’ या आगामी सिनेमासाठी त्याने केला होता.
या लूकमध्ये हा परफेक्शनिस्ट अभिनेता पिळदार मिशा, बाल्बो स्टाईल दाढी लूकमध्ये दिसतो. पण यात विशेष लक्ष वेधले ते त्याच्या डोक्यावरील मोठमोठ्या क्लिप्सने. ‘मॅड मॅक्स’ या हॉलीवूड सिरीजमध्ये शक्यतो हे पाहावयास मिळते. आता त्याचा याच सिनेमातला दुसरा लूकही व्हायरल झाला आहे. यात आमिर खान एका रंगीबेरंगी टीशर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. लाल रंगाचा चष्मा लावत कानात हेडफोन्स लावून तो कुठे तरी बघत चालताना या फोटोमध्ये दिसत आहे. त्याने दाढीच्या स्टाईलमध्येही नाविण्यता दाखवली आहे. आपल्याला सळ्यांनाच माहित आहे की आपल्या लूक्सवर आमिर खानला सतत प्रयोग करायला किती आवडते ते..
या सिनेमाद्वारे आमिरचा माजी व्यवस्थापक अद्वैत चंदन हा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. गायक बनण्याची इच्छा असलेल्या लहान मुलावर चित्रपटाची कथा आधारित आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात आमिर मुख्य भूमिकेत तर दिसणार नाहीच पण यात तो पाहुणा कलाकारही नाही. आता सर्वांना प्रश्न पडला असेल आमिर नक्की यात काय करणार आहे. तर सदर सिनेमा आमिर पाहुण्या कलाकाराचीच पण बऱ्यापैकी मोठी भूमिका साकारणार असून त्याच्याच जोरदार तयारीत तो व्यस्त आहे. आमिर खान चित्रपटात संगीत गुरूच्या भूमिकेत दिसेल.
दरम्यान, आमिर खानने अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्याच्या आगामी सिनेमाच्या बातमीला दुजोरा दिला. या सिनेमाचे नाव ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ असे आहे. सदर सिनेमाबाबतची उत्सुकता आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा आनंद व्यक्त करत आमिरने म्हटले की, माझ्यासाठी आदर्श असलेले मि. बच्चन यांच्यासोबत काम करण्याची वेळ अखेर आली आहे. या क्षणाची मी केव्हापासून वाट पाहत होतो. आदी, विक्टर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठी धन्यवाद. माझ्या आयुष्यात नेहमीच आदर्श मानत असलेल्या अभिनेत्यासोबत मी काम करणार असल्याचा मला आनंद होतोय. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला सिनेमाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून २०१८ साली दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होईल. चित्रीकरण सुरु होण्याची आतुरतेने वाट बघतोय, असे आमिरने ट्विट केले आहे.
खरंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ असं नाव असलेल्या या सिनेमाचे हेच नाव कायम राहिल असेही काही नक्की सांगता येत नाही. येत्या काळात यात बदल होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2016 रोजी प्रकाशित
‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये असाही दिसेल आमिर खान
त्याने दाढीच्या स्टाईलमध्येही नाविण्यता दाखवली आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-09-2016 at 18:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan new look for his upcoming movie secret superstar directed by advait chandan