बॉलिवूडच्या ‘खान’दानातील आमिर खान हा ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटात भूमिकेचा वेगळा लूक आणि स्टाईल राखण्याबाबतही तो प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या या मि. परफेक्शनिस्टला आता ‘सर्किट’ बनण्याचे वेध लागले आहेत. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ नंतर आता याच मालिकेत ‘मुन्नाभाई’चा तिसरा भाग येत असून यात आमिरला अर्शद वारसी याने केलेली ‘सर्किट’ ही भूमिका साकारायची आहे. ‘मुन्नाभाई’चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आमिरबरोबर ‘थ्री इडियट’साठी तर संजय दत्त बरोबर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’करता काम केले होते. आता हे तिघेही जण बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. आमिर व संजय दत्त पहिल्यांदाच बरोबर काम करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना आमिरने राजकुमार हिरानी यांच्याकडे ‘मुन्नाभाई’च्या पुढील भागात ‘सर्किट’ची भूमिका करायची इच्छा व्यक्त केली असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातील अर्शद वारसीने रंगविलेली ‘सर्किट’ ही व्यक्त्रिेखा आमिर खानने ‘रंगिला’मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती आहे. आमिरला ‘मुन्नाभाई’चे दोन्ही भाग आवडले होते. ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या भागात ‘सर्किट’साठी आमिरची निवड झाली तर प्रेक्षकांना आमिरचे वेगळे रुप आणि वेगळा ‘सर्किट’ पाहायला मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2014 रोजी प्रकाशित
आमिरला ‘सर्किट’ व्हायचयं!
बॉलिवूडच्या ‘खान’दानातील आमिर खान हा ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटात भूमिकेचा वेगळा लूक आणि स्टाईल राखण्याबाबतही तो प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या या मि. परफेक्शनिस्टला आता ‘सर्किट’ बनण्याचे वेध लागले आहेत.

First published on: 08-10-2014 at 06:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan wants to play circuit role