बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानला आपल्या मित्राचा म्हणजेच अभिनेता सलमान खान येऊ ठेपलेला ‘जय हो’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बघायचा आहे. त्याबद्दलचे आमिर खानने ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमधून आमिर खान म्हणतो, “जय हो येण्याची वाट बघतोय मी सलमान! रिलीज से पेहेले दिखादे मेरे भाय”
गेल्या काही दिवसांपासून आमिर खान ट्विटरच्या माध्यमातून सलमानची ‘जय हो’ करतोय, तर याआधी सलमाननेही बिगबॉग-७ मध्ये ‘धूम- ३’ चे प्रमोशन केले होते. त्याची परतफेड की काय? म्हणून आमिर ‘जय हो’चे प्रमोशन करत आहे आणि दोघे चांगले मित्र आहेत यात काही शंकाच नाही.
त्यामुळे आमिरने केलेल्या विनंतीवर सलमान त्याच्यासाठी ‘जय हो’चा खास शो ठेवणार का याची उत्सुकता बॉलीवूड मध्ये आहे.