अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंबीय हे कायमच चर्चेत असतात. आराध्या बच्चन ही ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची मुलगी आहे तर अमिताभ बच्चन यांची ती नात आहे. तिच्या विषयी एक फेक न्यूज व्हायरल झाली होती. त्यामुळे आता बच्चन कुटुंबाने ही फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनलच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. आराध्या बच्चनचं आयुष्य आणि तिच्या आरोग्याविषयी ही फेक न्यूज चालवण्यात आली होती.

बच्चन कुटुंबाने ठोठावला कोर्टाचा दरवाजा

आराध्याबाबत आलेल्या फेक न्यूजमुळे युट्यूब चॅनलविरोधात बच्चन कुटुंब कोर्टात गेलं आहे. आपल्या अर्जात बच्चन कुटुंबाने हे म्हटलं आहे की ज्या युट्यूब चॅनलने आराध्याबाबत बातमी दिली आहे त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी. तसंच ही व्हायरल होणारी बातमी थांबवली जावी. कारण आराध्या ही अल्पवयीन आहे. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर २० एप्रिलला या प्रकरणावरीच याचिकेची सुनावणी होणार आहे. यासंदर्भात बच्चन कुटुंबाने कुठलेही अधिकृत पत्रक काढलेले नाही. आज तकने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आराध्या बच्चन म्हणजेच अमिताभ बच्चन यांची नात मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकते आहे. आराध्या कविता म्हणतानाचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे कवी होते. तसंच अमिताभ बच्चन हे देखील उत्तमरित्या कविता सादर करतात. आराध्याची तुलना अमिताभ बच्चन यांच्या सादरीकरणाशीही केली गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ नोव्हेंबर २०११ ला आराध्याचा जन्म झाला. आराध्या ही सध्या ११ वर्षांची आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यासह आराध्याचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.