‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र, मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. त्यानुसार आज रविवारी (३ जूलै) सकाळी आरेत निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्थांसह सामान्यांचा प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने ते आरेत जमा होण्याची शक्यता आहे. याआधी देखील सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी याचा विरोध केला होता. आता अभिनेता सुमीत राघवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आरेत होणाऱ्या कारशेडला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा : “टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत

सुमीतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीतने एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉर्ट कुर्ला की आवाज या पेजचा आहे. “आरेचं जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी एकत्र या. ३ जुलै रविवारी ११ वाजता पिकनीक पॉइंट, आरे , असे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.” हा स्क्रिनशॉर्ट शेअर करत “एक वेगळा आवाज ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला मुंबई मेट्रो ३ ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा कारशेडचा,तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच”, असे कॅप्शन सुमीतनं दिले आहे.

पाहा पोस्ट

आणखी वाचा : “२०० बिहारी इथे उभे करीन…”, घरातल्याच कूकने पोटात चाकू खुपसण्याची अभिनेत्रीला दिली धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासूत्रे हाती घेताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी ‘मेट्रो ३’साठीचे कारशेड आरेतच होईल असे जाहीर केले. या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड बनवू नका असे म्हटले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी आरेत कारशेड करण्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे आता आरेवरून ‘कारे’ सुरू झाले असून येत्या काळात हा वाद अधिक चिघळणार आहे. या पार्श्वभूमीवर आता पर्यावरणप्रेमी, आरेवासीय आक्रमक झाले असून ‘आरे वाचवा’ (सेव्ह आरे) चळवळ तीव्र करण्यात आली आहे.

आणखी वाचा : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

‘जायका’ कंपंनीला पत्र..

मेट्रो ३ प्रकल्पाची उभारणी जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) च्या निधीच्या माध्यमातून केली जात आहे. ‘जायका’च्या धोरणानुसार प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची शाश्वती संबंधित यंत्रणांना द्यावी लागते. असे असताना ‘मेट्रो ३’ प्रकल्पात मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरेवर कशाप्रकारे घाव घातला जात आहे. याकडे ‘जायका’चे लक्ष वेधण्यासाठी ‘वॉचडॉग फाऊंडेशन’चे विश्वस्त ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी ‘जायका’ला पत्र पाठविले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यादृष्टीने ‘जायका’ने यात लक्ष घालावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरे वाचवण्यासाठी

शांततेत आंदोलन करणार आहोत. तसे आम्ही स्पष्ट केले आहे. असे असताना आरेत शनिवारी सकाळीच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यामुळे पर्यावरणप्रमींमध्ये नाराजी आहे.