बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi EID Kabhi Diwali) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सतत चर्चेत आहे. यापूर्वी शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि राघव जुयाल (Raghav Juyal) हे या चित्रपटात दिसणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर सलमान खानचा फर्स्ट लुक आणि शूटींगचे फोटो व्हायरल झाले, जे पाहिल्यानंतर चाहते चांगलेच उत्साहित झाले. आता या चित्रपटातून सलमानचा मेहूना म्हणजेच अभिनेता आयुष शर्माने (Ayush Sharma) काढता पाय घेतला आहे.

जानेवारी महिन्यात अशी अफवा पसरली होती की आयुष सलमानच्या चित्रपटाचा भाग होणार नाही, कारण या चित्रपटात त्याची भूमिका हा फारशी खास नव्हती. एवढचं काय तर अंतिमच्या कौतुकानंतर त्याने सहाय्यक भूमिका करण्यास नकार दिला. ‘ETimes’ ने दिलेल्या वृत्तानुसार, आयुषला स्क्रिनवर दिसण्यापेक्षा डायलॉग्स जास्त पाहिजे होते. अंतिल’ मधील त्याच्या ग्रे शेड भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आणि ‘कभी ईद कभी दिवाळी’ मधील त्याची भूमिका योग्य न्याय देऊ शकणार नाही असे त्याला वाटते.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
bade miyan chote miyan release date
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

आणखी वाचा : “शूटिंग दरम्यान अनोळखी व्यक्तिने २१ लाख रुपये देऊ केले तर…”, प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

आयुष या चित्रपटात सलमानच्या भावाची भूमिका साकारणार होता. तर या चित्रपटात सलमानचे दोन भाऊ दाखवण्यात येणार होते. आयुष आणि झहीर इक्बालऐवजी निर्माते आता भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरी यांना चित्रपटात कास्ट करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.