छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १५वे सिझन सुरु आहे. आता या सिझनने वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्याचे आपण पाहिले आहे. अभिनेत्री रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी, राखी सावंत पाठोपाठ आता अभिजीत बिचुकलेची देखील बिग बॉसच्या घरात एण्ट्री झाली आहे.

बिग बॉस १५च्या घरात चार वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्या आहेत. त्यामध्ये मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धक अभिजीत बिचुकले देखील आहे. कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीतची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे. अभिजीतला पाहून राखी ‘अरे मंत्री साहेब कसे आहात आपण’ असे बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : आमिर खानने चक्क ‘KGF २’च्या निर्मात्यांची आणि अभिनेता यशची मागितली माफी, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीत बिचुकले हा ‘बिग बॉस मराठी’मध्ये होता. मराठी बिग बॉसमध्ये जेव्हा सलमानने हजेरी लावली तेव्हा महेश मांजरेकर यांनी अभिजीतविषयी भाईजानला सांगितले होते. त्यांनी सांगितलं की अभिजीतने ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा पूर्ण नकाशा बदलून टाकला होता. अभिजीत हा साताऱ्याचा आहे. अभिजीतने महापालिका ते संसदेपर्यंत निवडणूक लढवली आहे. तो स्वत:ला कलाकार, लेखक, कवी, गायक आणि कंपोजिशन मेकर म्हणवतो. अभिजीतची पत्नी ही सोशल वर्कर आहे.