बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनालेला आता काहीच दिवस उरले आहे. अशात या शोमध्ये आणखी एक एविक्शन झालं. नुकत्याच झालेल्या डबल एविक्शनमध्ये देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. तर रश्मी देसाईला ‘तिकिट टू फिनाले’ मिळालं. अभिजित बिचुकले आणि देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील वातावरण थोडं दुःखी वाटत असलं तरीही राखी सावंत मात्र खूश दिसत होती. अभिजित बिचुकले घरातून बाहेर पडल्यामुळे राखी सावंतला आनंद झाल्याचं पाहायला मिळालं.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये राखी सावंत, रश्मी देसाई, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल गार्डनच्या भागात बसून गप्पा मारताना दिसले. या वेळी रश्मी देसाई अभिजित बिचुकलेचा आवाज काढण्याचा प्रयत्न करते. ज्यावर प्रतीक असं काही बोलतो की राखी सावंत अभिजित बिचुकलेचं नाव ऐकूनच हात जोडते.

रश्मी देसाईचा आवाज ऐकून प्रती सहजपाल म्हणतो, ‘रश्मीचा आवाज ऐकून मला वाटलं की बिचुकले दादा आले की काय.’ त्यावर रश्मी जोरात ओरडून बोलते, ‘काहीही बोलू नकोस.’ त्यानंतर प्रतीकचं बोलणं ऐकून राखी सावंतही त्याला सुनावते आणि सांगते, ‘जर तुला त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे तर तू पहिलं जाऊन त्या पूलमध्ये उडी मार.’

राखी हात जोडून प्रतीकला म्हणते, ‘मी धन्य झाले की, बिचुकले दादा इथून गेले. तुला जर त्यांच्या जाण्याचं वाईट वाटतंय तर तू इथून त्या पूलमध्ये उडी मार. मला तर खूप आनंद झाला आहे.’ यावर प्रतीक म्हणतो, ‘आता मी टाइमपास देखील करू शकत नाही का?’ त्याच्या अशा बोलण्यावर राखी त्याच्यावर भडकते. ती म्हणते, ‘तुझ्या टाइमपाससाठी आम्ही त्यांना सहन करू शकत नाही. आम्हाला माफ कर.’ यावर रश्मी देखील प्रतीक म्हणते, ‘तू एकटाच होतास जो त्याच्याशी विचित्र गप्पा मारत बसत होतास.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हे सर्व बोलणं झाल्यानंतर राखी सावंत आणि प्रतीक सहजपाल यांचं भांडण होतं. प्रतीक राखीला ‘चहामध्ये बुडलेलं बिस्किट’ म्हणतो. ज्यावरून राखी त्याच्यावर भडकते आणि दोघांमध्ये जोरदार भांडण होतं. पण यामध्ये हस्तक्षेप करत घरातील इतर सदस्य हे भांडण थांबवतात. बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यासाठी तेजस्वी प्रकाश, निशांत भट्ट, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, राखी सावंत आणि रश्मी देसाई यांनी आपली जागा निश्चित केली आहे. हे सर्व आता विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.