अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी गुरु, रावण, कुछ ना कहो आणि सरकार राज यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. या सगळ्याच सिनेमात प्रेक्षकांना या दोघांची जोडी फार आवडली होती.. त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. पण २००७ मध्ये लग्न केल्यानंतर या दोघांनी एकाही सिनेमात एकत्र काम केले नाही. पण स्वतः ऐश्वर्या, अभिषेक बरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच ते दोघे एकत्र सिनेमा करणार असल्याच्या चर्चा सिनेवर्तुळात सुरु होत्या. पण स्वतः अभिषेकने या गोष्टीला नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभुदेवासोबत अभिषेक बच्चन आणि बंटी वालिया याच्या मोशन पिक्चर्स अंतर्गत एक नवीन सिनेमा बनवत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा होम प्रोडक्शन सिनेमा असल्यामुळे ऐश्वर्या या सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक होती. पण अभिषेकला त्याच्या सिनेमात मुख्य भूमिका निभावण्यासाठी एका तरुण चेहऱ्याची गरज होती. तो सध्या नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. अभिषेकला वाटते की, ऐश्वर्या या व्यक्तिरेखेसाठी जास्त मोठी आहे. पण याबाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे खरे कारण काय आहे हे कोणालाच माहित नाही.

अभिषेक बच्चनला त्याच्या मुलीच्या म्हणजे आराध्याच्या पाचव्या वाढदिवसा दिवशी १ कोटी फॉलोवर्सची भेट त्याच्या चाहत्यांकडून मिळाली. ४० वर्षाच्या या अभिनेत्याने आपला आनंद ट्विटरवर शेअर केला. त्याने लिहिले की, ‘माझ्या मुलीच्या वाढदिवसा दिवशी मला ही भेट मिळाली. आपली टीम वाढत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि सन्मान.’

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या नवी वर्षाच्या स्वागतासाठी दुबईला रवाना झाले आहेत. या तिघांनाही नुकतेच मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. तिघांच्या पोशाखामध्येही साम्य होते. तिघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकने निळ्या रंगाची जिन्स घातली होती. यंदा अनेक सेलिब्रिटी नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करताना दिसत आहेत. हृतिक रोशन त्याच्या दोन्ही मुलांसोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दुबईला गेला आहे. त्यांच्याबरोबर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानही आहे. तसेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगही नवीन वर्षाचे स्वागत दुबईहून करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan rejected wife aishwarya rai bachchan for upcoming film
First published on: 30-12-2016 at 21:02 IST