तंत्रज्ञानात होत चाललेल्या प्रगतीबरोबरच ऑनलाईन माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. अभिनेते अन्नू कपूर यांची नुकतीच इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली. त्या फसवणुकीत त्यांचे नुकसानही झाले. त्यांनी पोलिसात तक्रार केल्यावर काही रक्कम परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : आलिशान गाड्यांना डावलून सारा अली खानने केला ऑल्टो गाडीतून प्रवास, कारण ऐकून व्हाल थक्क

ओशिवरा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, “अन्नू कपूर यांना बुधवारी एक फोन आला होता. त्यामध्ये त्यांना केवायसी अपडेट करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अन्नू कपूर यांना बँकेची माहिती मागण्यात आली. तसेच वनटाईम पासवर्ड अर्थात ओटीपी शेअर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अन्नू कपूर यांनी ओटीपी शेअर केला.

हेही वाचा : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’, नुसरत नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

दरम्यान फोन करणाऱ्या व्यक्तीने काही वेळाने अन्नू कपूर यांच्या खात्यातून आधी २ लाख आणि नंतर २ लाख ३६ हजार असे एकूण ४ लाख ३६ हजार काढून घेतले. मात्र तातडीने अन्नू कपूर यांना बँकेकडून फोन आला आणि खात्यातून काही रक्कम काढली गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कपूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच दोन्ही बँकांची खाती फ्रीज केले. त्यामुळे ३ लाख ८ हजार रुपये परत मिळविण्यात यश आले. आता याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी केलेल्या सहकाऱ्याबद्दल अन्नू कपूर यांनी सोशल मिडियावरून पोलिसांचे आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor annu kapoor loses rs 4 36 lakh to fraudster over account kyc rnv
First published on: 02-10-2022 at 10:38 IST