अभिनेते आणि उत्तर प्रदेशमधील गोरखपूर सदरचे खासदार रवी किशन यांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलंय. त्यांनी मुंबईतील एका बिल्डरविरोधात ३.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कँट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रवी किशन यांची मुंबईतील एका बिल्डरने ३.२५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. रवी किशन यांनी कँट पोलिसांकडे तक्रार करताना सांगितले की, २०१२ साली पूर्व मुंबईतील कमला पाली बिल्डिंगमध्ये राहणारे जैन जितेंद्र रमेश यांना रवी किशन यांनी सव्वा तीन कोटी रुपये दिले होते. त्यांनी पैसे परत मागितले सांगितले असता त्याने रवी किशन यांना ३४ लाखांचे १२ चेक दिले. हे चेक विलेपार्ले, पीएम रोड, मुंबई येथील टीजेएचडी या सहकारी बँक लिमिटेडचे ​​होते.

Bigg Boss 16: “मला १००० कोटी…” सलमान खानचा मानधनाबद्दल खुलासा

रवी किशन यांनी ७ डिसेंबर २०२१ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक रोड गोरखपूर शाखेत ३४ लाखांचे चेक जमा केले होते. पण खात्यात पैसे जमा झाले नाहीत. नंतर १६ फेब्रुवारी २०२२ रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहून चेक बाऊन्स झाल्याचे सांगितले. याप्रकरणी रवी किशन यांनी बिल्डर जैन जितेंद्र रमेश यांच्याशी बातचीत केली, पण ते पैसे परत करण्यास तयार झाले नाहीत, त्यामुळे अभिनेत्याने तक्रार दाखल केली.

टीव्हीवरील ‘या’ दोन लोकप्रिय सूना बिग बॉसमध्ये दिसणार? समोर आली महत्वाची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी पोलिसांनी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. तपास व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती कँट पोलीस स्टेशनचे प्रभारी शशी भूषण राय यांनी दिली.