सोशल मीडियावर कायमच वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. यात अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स बनवत ट्रेंड फॉलो करताना पाहायला मिळतात. अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती इन्स्टाग्रामवर रील शेअर करत असतात. मात्र या रील्ससाठी वापरण्यात आलेल्या अनेक गाण्यांमध्ये अश्लील शब्द आहेत. इन्स्टाग्रामवर जस्टिन बीबरचं ‘स्टे’ हे गाणं तसचं ‘शट अप एंड बेंड ओवर’ ही गाणी रील्ससाठी ट्रेंडमध्ये आहेत. या आणि अशा काही गाण्यांमध्ये अश्लील शब्द असून काही लोक त्याचे अर्थ न जाणून घेताच लहान मुलांचे किंवा कुटुंबासोबतचे रील शेअर करत आहेत.

या अश्लील गाण्यांवर रील शेअर करणाऱ्या नेटकऱ्यांवर ‘बधाई हो फेम’ अभिनेते गजराज राव यांनी निशाणा साधला आहे. तसचं अभिनेत्री रिचा चड्ढाने देखील अशा रील बनवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केलीय. अभिनेते गजराज राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ग्राफिक आर्टिस्ट प्रसाद भट्ट यांनी अश्लील गाण्यांवर रील्स बनवणाऱ्यांवर संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रसाद यांचा हा व्हिडीओ गजराज यांनी रिपोस्ट केला आहे. “मी प्रसादच्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे” असं कॅप्शन गजराज यांनी व्हिडीओला दिलंय.

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

मोनोकनीमधील परिणीती चोप्राचा ‘जलपरी’ अंदाज व्हायरल, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

या व्हिडीओत प्रसाद भट्ट म्हणालेत, “तुम्ही लोक इन्स्टाग्रामवर रील बनवण्याआधी गाण्यांचा अर्थ समजून घेता तरी का? मी पाहतोय की आजी आजोबांसह संपूर्ण कुटुंब ‘शट अप और बेंड ओवर’ गाण्यावर डान्स करत आहे. यामुळे तुम्हाला काहीच फरक पडत नाही का? हे काय चाललंय? व्हायरल होण्यासाठी तुम्ही तुमची प्रतिष्ठादेखील पणाला लावत आहात” असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान गजराज राव यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री रिचा चड्ढाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मी सहमत आहे. जेव्हा अर्थ माहित नसतानादेखील काही मुलं या गाण्यावर डान्स करत असल्याचं मी पाहते तेव्हा ते खूप अस्वस्थ करणारं वाटतं. इन्स्टाग्राम हे तुमची कला दाखवण्यासाठी, जगाशी संवाद सांधण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पण डॉक्टर, बँकर, न्यूट्रीशियनिस्ट, बुक रीडर सगळ्यांनाच रीलमध्ये नाचून आपली गोष्ट मांडायची आहे. पण का?” असं रिचा म्हणालीय.

‘बिग बॉस मराठी ३’च्या चावडीवर महेश मांजरेकर मीरा जगन्नाथवर भडकले; म्हणाले “तू आधी…”


रिचा सोबतच गजराज राव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नमिता दास, सुमीत व्यास या सेलिब्रिटींनी त्याच्या मताला पाठिंबा दिला आहे.