‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. छोट्या पडद्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने हा आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ओंकार भोजने हा लवकरच ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आजही प्रेक्षक त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रेतला कलाकार म्हणून ओळखतात.
ओंकारच्या ‘सरला एक कोटी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. तेव्हा त्यांनी आपल्या भूमिकेविषयी सांगितले, तेव्हा एबीपी माझाच्या पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला की ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागे नेमकं कारण काय? यावर तो म्हणाला, “मला दोन चित्रपटात काम करण्याची संधी आली होती आणि माझ्यामुळे त्यांना सारखे ऍडजस्ट करावे लागत होते म्हणून मला ब्रेक हवा होता तसेच माझी प्रकृती ठीक नव्हती म्हणून मी या कार्यक्रमातून कायमचा ब्रेक घेतला.”
“महाराष्ट्राची हास्यजत्रेत त्याचं टॅलेंट…” ओंकार भोजनेबद्दल वनिता खरातची प्रतिक्रिया चर्चेत
ओंकारने पुढे ‘फु बाई फु’ मध्ये का सहभागी झाला यावर तो म्हणाला की, “मला एक फोक प्रकार करायचा होता ती संधी मला फु बाई फु या कार्यक्रम मिळाली म्हणून मी तो कार्यक्रम स्वीकारला, आणि या सगळ्यातून मी शिकत गेलो माझे सध्या चांगले चालले आहे.”अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, इशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे. तर ओंकार व ईशासह छाया कदम चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसतील. २० जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.