रेश्मा राईकवार

गुजराती रंगभूमी ते हिंदी चित्रपट असा मोठा प्रवास केलेला आणि चोखंदळ भूमिकांमधूनही प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता प्रतीक गांधी सध्या त्याच्या लागोपाठ प्रदर्शित झालेल्या ‘मडगाव एक्स्प्रेस’ आणि ‘दो और दो प्यार’ या चित्रपटांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. योगायोग म्हणजे प्रतीकने गुजराती रंगभूमीवरही चरित्रभूमिका अधिक केल्या आहेत आणि हिंदीतही तो चरित्र भूमिका करतो आहे. त्याला चरित्रपट करायला अधिक आवडतं, असं तो म्हणतो.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
Rohit Shetty Singham Again movie Circus of entertainment news
मनोरंजनाची सर्कस
rajeshwari kharat new photo in wedding outfit netizens confused
“आम्हाला वेड्यात काढू नका”, जब्या-शालूचा लग्नाचा फोटो पाहून नेटकरी संभ्रमात; अनेकांनी केलं ट्रोल
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Abhijeet Sawant
“लाखो-हजारात माझी ताई तू…”, भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे

चरित्रपट आणि प्रतीक गांधी हे एक घट्ट समीकरण ठरून गेलं आहे. ‘स्कॅम १९९२’ या वेबमालिकेतील त्याची भूमिका ही एकादृष्टीने चरित्र भूमिका होती आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. आत्ताही त्याने अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपटात महात्मा जोतिबा फुले यांची भूमिका केली आहे. शिवाय, लवकरच तो हंसल मेहता दिग्दर्शित ‘गांधी’ या वेबमालिकेत महात्मा गांधीजींची भूमिका करणार आहे.

वेगवेगळया शैलीतील चित्रपट आणि भूमिका करण्याची माझी पहिल्यापासूनच इच्छा होती. पण मी हरतऱ्हेच्या भूमिका करू शकतो असा विश्वास दिग्दर्शकांना वाटायला हवा. तसा त्यांचा माझ्यावर विश्वास असल्याचं मी गेल्या काही दिवसांत जे चित्रपट केले त्यावरून मला जाणवतं. प्रेक्षकांनीही मला विविध भूमिकांमधून आपलंसं केलं आहे याचा आनंद अधिक वाटतो. एका कलाकारासाठी यापेक्षा सुंदर काय असू शकतं?

‘दो और दो प्यार’ची कथा भन्नाट

‘दो और दो प्यार’ या चित्रपटाची कथा भन्नाट आहे. अशी कथा तुम्ही नजीकच्या काळात कुठल्या चित्रपटातून पाहिली असेल असं मला वाटत नाही. किंबहुना त्या कथेमुळेच मी चित्रपट करण्यासाठी तयार झालो, असं प्रतीकने सांगितलं. अनिरुद्ध  बॅनर्जी नावाची व्यक्तिरेखा मी साकारली आहे. नकळत सतत चुका करणारा, निर्णयापासून सतत दूर पळणारा, त्याची जबाबदारी न घेणारा असा अनिरुद्ध आहे. दहा-बारा वर्ष संसार करून एकमेकांना कंटाळलेल्या नवरा-बायकोची ही गोष्ट आहे. एकमेकांबद्दल त्यांना काहीच भावना उरलेल्या नाहीत, त्यामुळे दोघांचंही बाहेर प्रेमप्रकरण सुरू आहे. काही तरी कारणाने या दोघांना एकत्र यावं लागतं. तेव्हा ते पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग हे प्रेम टिकवण्यासाठी आपल्या बाहेरच्या जोडीदारांशी फसवाफसवीचा त्यांचा खेळ सुरू होतो. आत्ताच्या काळात नातेसंबंधांमध्ये कितीही मोकळेपणा असला तरी अशाप्रकारचा गोंधळ आणि गंमत मांडणारी ही कथा मला अधिक भावली, असं त्याने सांगितलं.

हेही वाचा >>> नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!

‘दो और दो प्यार’ चित्रपटात त्याने विद्या बालनबरोबर काम केलं आहे. ‘विद्या एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, पण एक व्यक्ती म्हणून ती खूप साधी सरळ आणि सुंदर स्वभावाची आहे. चांगला कलाकार नेहमी असा असला पाहिजे, ज्याच्याबरोबर काम करताना कुठल्याही कलाकाराला एक सहज मोकळेपणा जाणवला पाहिजे. तो सहजपणा विद्या बालनबरोबर काम करताना मिळतो’ असं त्याने सांगितलं.

 ‘फुले’ या चित्रपटात त्याने अनंत महादेवन यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आहे. अनंत महादेवन यांच्यासारखे अभ्यासू, विचारवंत दिग्दर्शक फार कमी आहेत. त्यांच्या सारख्या ज्ञानी लोकांबरोबर काम करताना आपसूकच तुम्ही खूप काही शिकता, अनुभवाचं संचित तुमच्याकडे गोळा होतं, असं तो सांगतो.

अभिनय आणि अभियांत्रिकी..

अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या प्रतीकने २०१६ मध्ये पूर्णपणे अभिनय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याआधी तो अभियंता आणि अभिनेता दोन्ही आघाडया सांभाळून काम करत होता. त्याविषयी सांगताना तो म्हणतो, ‘मी शाळेत असल्यापासून रंगभूमीवर काम करत होतो. शालेय शिक्षण झाल्यानंतर अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायचं हाही निर्णय माझाच होता. किंबहुना मला अभियंता म्हणून कामही करायचं होतं आणि अभिनयाची आवडही जोपासायची होती. साधारणपणे एकीकडे त्रास झाला किंवा दुसरीकडे खूप संधी आल्या की आपण पहिलं सोडून देतो. माझं असं झालं होतं की ज्या कंपनीत काम करत होतो तिथेही पदोन्नती मिळत गेली. काम वाढत गेलं. आणि गुजराती रंगभूमीबरोबरच चित्रपटांमध्येही संधी मिळत होती. तोपर्यंत हिंदीत काही झालेलं नव्हतं माझं.. पण एक क्षण असा आला की दोन्ही करणं शक्य होणार नाही. एक काहीतरी निवडूनच पुढे जावं लागेल. तेव्हा मी अभिनेता होण्याला प्राधान्य दिलं’.

चरित्रपट करायला मला अधिक आवडतात. ज्या व्यक्तीचा चरित्रपट आहे त्या व्यक्ती बहुत करून सगळयांच्या परिचयाच्या असतात. त्यांच्याविषयी लोकांनी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, क्वचित पाहिलेलंही असतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेगवेगळया टप्प्यांवर काय केलं, काय नाही हे लोकांना माहिती असलं तरी त्या त्या घटनेदरम्यान त्यांच्या मनात काय सुरू होतं? त्यांच्या डोक्यात काय विचारचक्र फिरत होतं हे आपल्याला माहिती नसतं. मी तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आणि ते माझ्या अभिनयातून पडद्यावर रंगवतो. त्यामुळे मला चरित्र भूमिका अधिक भावतात.         – प्रतीक गांधी