अभिनेता सिद्धार्थ जाधवचे (Siddharth Jadhav) सध्या एकापाठोपाठ एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सिद्धार्थचा ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची चर्चा सुरु असतानाच त्याचा आज ‘दे धक्का २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का’ने प्रेक्षकांचं मन जिंकलं. आता दुसऱ्या भागामध्ये चित्रपटामधील जाधव कुटुंबिय लंडनला पोहोचलं आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा धमाल व्हिडीओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – मराठी चित्रपटांचे प्रेक्षक आहेत कुठे? महेश मांजरेकरांना पडला प्रश्न, म्हणाले, “दाक्षिणात्य चित्रपट…”

सिद्धार्थ मुंबईमधील शिवडी परिसरामध्ये लहानाचा मोठा झाला. अगदी सामान्य कुटुंबातील हा मुलगा आज मराठी चित्रपटसृष्टीमधील उत्तम अभिनेता आहे. आज सिद्धार्थने यशाचं शिखर गाठलं तरी शिवडी आणि तिथे गेलेलं बालपण तो विसरला नाही. म्हणूनच की काय लंडनमध्ये ‘दे धक्का २’चं चित्रीकरण करत असताना त्याला शिवडीची आठवण आली.

पाहा व्हिडीओ

लंडनमध्ये जाऊन इंग्रजी भाषेमध्ये तिथल्या लोकांशी संवाद साधणं सिद्धार्थसाठी कठीण होऊन बसलं. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते दिसून येतं. “तुम्हाला मी इंग्रजी भाषेमध्ये बोललेलं समजत आहे का? पण मी इंग्रजी भाषेमध्ये बोलत असताना हे बघा माझ्याबरोबरचे इतर लोक मजा घेत आहेत. शिवडीची केवढी ती इंग्लिश.” असं या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ तिथल्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत. पण हे बोलत असताना तो इंग्रजी भाषेचा वापर करत आहे. ते ऐकून तुमलाही हसू आवरणार नाही.

आणखी वाचा – Video : लग्नापूर्वीच लंडनला गेलेल्या राणादा-पाठकबाईंचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, मराठमोळ्या कपलची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थची इंग्रजी भाषा ऐकून त्याच्या बरोबरची मंडळी म्हणजे मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, संजय खापरे यांना देखील हसू अनावर होताना दिसत आहे. तसेच सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून ‘दे धक्का २’ प्रेक्षकांना भरभरून मनोरंज करणार असं दिसतंय.