मराठमोळे टीव्ही अभिनेते योगेश महाजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आता आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेते विजय रंगराजू उर्फ ​​राज कुमार यांचे चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबादमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी चेन्नईला हलवण्यात आलं होतं, पण तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चेन्नईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

विजय रंगराजू हे लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते होते. त्यांच्या निधनाबद्दल चाहते शोक व्यक्त करत आहेत. त्यांना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून श्रद्धांजली वाहिली जात आहे. विजय यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली, दीक्षिता आणि पद्मिनी असा परिवार आहे.

विजय रंगराजू यांचे खरे नाव राज कुमार होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी चेन्नईतील अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं. नंदमुरी बालकृष्णाच्या भैरव द्वीपममध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये नकारात्मक आणि सहाय्यक भूमिका साकारण्यासाठी विजय रंगराजू ओळखले जायचे.

विजय रंगराजू यांनी सीता कल्याणम या सिनेमातून तेलुगू सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अशोक चक्रवर्ती, स्टेट राउडी आणि विजय यासह अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. गोपीचंद यांच्या यज्ञममधील त्यांनी केलेली खलनायकाची भूमिका खूप गाजली होती. अभिनयाबरोबरच विजय रंगराजू यांना वेटलिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंगची आवड होती.

योगेश महाजन यांचे निधन

योगेश महाजन ‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेचं उमरगावमध्ये शूटिंग करत होते. या मालिकेत ते शुक्राचार्य हे पात्र साकारत होते. शनिवारी संध्याकाळी शूटिंग संपवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होतं, ते डॅाक्टरांकडे गेले आणि औषधं घेतली; नंतर हॅाटेलमधील त्यांच्या खोलीत झोपले. पण ते रविवारी सेटवर आले नव्हते, त्यामुळे मालिकेच्या टीममधील लोकांनी त्यांना फोन केले, मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगेश यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने टीममधील काही लोक ते थांबलेल्या हॅाटेलमध्ये गेले. तिथे दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडवरून खाली पडले होते. खोलीतच त्यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.