प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी याने नुकतंच छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. रंगभूमी आणि चित्रपटामध्ये पदवी घेतलेल्या विराजसने मोठं झाल्यावर याच क्षेत्रात करियर करणे स्वभाविकच होते. झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत आदित्य या पात्रामुळे तो घराघरात पोहोचला. ‘माझा होशील ना’ या मालिकेत त्याने साकारलेला आदित्य प्रेक्षकांना विशेष भावला होता. नुकतंच विराजसने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो बोलक्या बाहुल्याचा खेळ करताना दिसत आहे.

विराजसने शेअर केलेला हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा आहे. यात त्याच्यासोबत त्याचा स्लॅपी हा बाहुला दिसत आहे. यात विराजस हा कुणालाही कळू देता सराईतपणे बाहुल्याला बोलकं करताना दिसत आहे. विराजसचं हे नवं टॅलेंट पाहून सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या या व्हिडीओला सोशल मीडियावरही मोठी पसंती मिळत आहे. यापूर्वीही विराजसने अशाप्रकारे एक व्हिडीओ तयार केला होता. त्याचा तोही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तू खरखरोच सर्वगुणसंपन्न असा व्यक्ती आहे,” अशी कमेंट एका नेटकऱ्याने या फोटोच्या खाली केली आहे. तर “एकाने दादा, खूप छान,” असे लिहिले आहे. लवकरच विराजस त्याच्या स्लॅपीसोबत असेच आणखी काही मनोरंजनात्मक व्हिडीओ पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो असे व्हिडीओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या व्हिडीओमुळे विराजस आता आणखी एका क्षेत्रात नाव गाजवताना दिसणार असल्याचे बोललं जात आहे.