लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अंकिता-विकीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त दोघांनी कुटुंबियांबरोबर धम्माल सेलिब्रेशन केलं. त्यांचे सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनचे फोटो पाहून ती लवकरच आई होणार असल्याचे बोललं जात आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी नुकतंच त्यांच्या लग्नाचा ६ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन केले. या दरम्यानचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यावेळी अंकिताने सैल ड्रेस परिधान केला होता. या फोटोंना तिने हटके कॅप्शन दिले होते.

खास साडी परिधान करत अंकिता लोखंडेने साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, साडीची किंमत माहितीये का?

“सहा महिन्याच्या शुभेच्छा बाळा. माझे हे क्षण खास बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. तुम्हाला खूप खूप प्रेम. माझ्या प्रिय वहिनीचे विशेष आभार. तिने आमचा हा दिवस इतका अविस्मरणीय बनवला. मला सर्वांची आठवण येत आहे. लवकर परत या. खूप खूप प्रेम”, असे अंकिता लोखंडेने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

“अमृता तू माझ्यासाठी एखादी स्टार नाहीस तर…”, अंकिता लोखंडेने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिताने हे कॅप्शन देताना बाळाचा एक इमोजी शेअर केला आहे. त्यामुळे ती गरोदर असल्याचे बोलले जात आहे. तिने परिधान केलेला सैल ड्रेस आणि कॅप्शनमधील इमोजीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या सेलिब्रेशनच्या फोटोनंतर अंकिता लोखंडे लवकरच ती आई होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच त्या दोघांनीही यावर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.