Esha Gupta reveals if she dated Hardik Pandya : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. हार्दिकचं नाव आतापर्यंत अनेक तरुणींशी जोडलं गेलंय. काही वर्षापूर्वी तो बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिला डेट करत असल्याच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. हार्दिकबरोबर रिलेशनशिपमध्ये होती की नाही याबद्दल स्वतः ईशाने खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ईशा कबुल करत म्हणाली, “हो, काही काळ आम्ही बोलत होतो. पण मला वाटत नाही की आम्ही डेटिंग करत होतो. आम्ही काही महिने नक्कीच बोलत होतो. आम्ही ‘कदाचित डेट करू किंवा नाही’ अशा टप्प्यावर होतो. पण आम्ही डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच सगळं संपलं. म्हणजे खरं तर ते डेटिंग-डेटिंग नव्हतं. आम्ही एक-दोनदा भेटलो, बस्स इतकंच. तर हो, मी म्हटल्याप्रमाणे काही महिने आम्ही बोललो आणि नंतर ते संपलं.”

दोघेही एक जोडपं म्हणून एकत्र येऊ शकले असते का? असं विचारल्यावर ईशा गुप्ता म्हणाली, “कदाचित ते घडलं असतंही. पण मला वाटत नाही की ते घडायला पाहिजे होतं. कारण त्या बिचाऱ्यांना लाईव्ह टीव्हीवर काही गोष्टी बोलल्याने टीकेचा सामना करावा लागत होता. त्याआधीच आम्ही एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं.”

ईशाने ‘कॉफी विथ करण’च्या त्या एपिसोडचा उल्लेख केला, ज्यात हार्दिक पंड्या व केएल राहुल एकत्र गेले होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे चांगलाच गदारोळ माजला होता. “करण जोहरच्या शोचा एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. खरं तर ते बिचारे दोघेही आधीच इतका त्रास सहन करत होते,” असं ईशाने नमूद केलं.

मला आईची बोलणी खायला आवडतं- ईशा गुप्ता

हार्दिक व तिच्यातलं सगळं कसं संपलं, असं तिला विचारण्यात आलं. “तो एपिसोड प्रसारित झाला, त्याआधीच आमच्यातलं सगळं संपलं होतं. आम्हाला असं जाणवलं की आम्ही एकमेकांसारखे नाही आणि कम्पॅटिबल नाहीयोत. आणि प्रत्येकाचा एक टाइप असतो. मला प्रसिद्धीपेक्षा कुटुंब आणि खरं आयुष्य जास्त आवडतं. अर्थात मला माझं काम आवडतं. कॅमेरा नसता तर ईशा गुप्ता नसती. पण दिवस संपला की घरी जाऊन माझ्या आईची विचारपूस करायला आवडतं, तिची बोलणी खायला मला आवडतं. दररोज उठून देवा मी व माझा पती किती सुंदर दिसतो असं म्हणायला मला जमणार नाही. मला ते सहनच होणार नाही,” असं ईशा गुप्ता म्हणाली.

आम्ही खूप वेगळे होतो – ईशा गुप्ता

हार्दिक पंड्या तसा नाही, आपण फक्त फिल्म इंडस्ट्रीतील सामान्य टेंडन्सीबद्दल बोलल्याचं ईशाने स्पष्ट केलं. “मी हार्दिक पंड्याबद्दल काहीच बोलत नाहीये. ते इंडस्ट्रीबद्दल होतं. कारण प्रत्येक नात्याचे विविध टप्पे असतात. आम्ही दोघेही एकमेकांना भेटून चर्चा करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलोच नाही. मला वाटलं की आम्ही कम्पॅटिबल नव्हतो, त्यामुळे आमच्यातील गोष्टी कधीच पुढे गेल्या नाहीत. त्याच्यात किंवा माझ्यात काहीतरी कमतरता होती, असं अजिबात नाही. आम्ही खूप वेगळे होतो. आणि एक-दोन महिन्यांत त्यालाही कळलं की मी त्याच्या टाइपची नाही आणि मलाही तो माझ्या टाइपचा नाही हे लक्षात आलं,” असं ईशा गुप्ता म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशा गुप्ता व हार्दिक पंड्या २०१८ मध्ये एका पार्टीत भेटले आणि नंतर डेटिंग करू लागले अशा चर्चा तेव्हा खूप रंगल्या होत्या. पण डेटिंगच्या टप्प्यावर नातं पोहोचलंच नव्हतं, असं आता ईशा गुप्ताने स्पष्ट केलं आहे.