अभिनेत्री हिना खान बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल सोबत करणार लग्न?

आम्ही कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवत नाही. तसच फक्त पर्सनल लाइफ मध्ये नवे तर प्रोफेशनलीसुद्धा एकमेकांच्या कामाचा आदर करतो. असे रॉकीने त्या मुलाखतीत सांगितले.

hina-khan-rocky-jaiswal
(Photos-instagram/hina khan)

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत असते. व्यावसायिक  लाइफसोबतच हिना खान तिच्या वैयक्तिक लाईफमुळे देखील तितकीच चर्चेत असते. सध्या हिना खानच्या चाहत्यांना ती लग्न कधी करणार असा प्रश्न पडला आहे. हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड चित्रपट निर्माता रॉकी जयस्वाल गेले अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत.मात्र आता त्यांच्या चाहत्यांना ते लग्न कधी करणार असा प्रश्न सतावत आहे. या प्रश्नाचे उत्तर आता रॉकीने एका मुलाखतीत दिले.

हिना खान आणि रॉकी जयस्वालची  भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’या मालिकेच्या सेटवर झाली. हिना खानने या मालिकेत अक्षराची प्रमुख भूमिका साकारली होती. कालांतराने रॉकी आणि हिनाच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते रिलेशनशीपमध्ये आले. त्यांच्यात लग्न हा विषय होतो मात्र त्यांना फक्त समाज काय म्हणेल? या कारणासाठी लग्न नाही करायचे. असे त्याने एका मुलाखतीत सांगितले असे त्याने एका मुलाखतीत सांगितले. तो पुढे म्हणाला की, “आम्ही आता बरेच वर्ष रिलेशनशीपमध्ये आहोत. एका लग्न केलेल्या जोडप्यांच्या आयुष्यात जे उतार चढाव येतात ते आम्ही आधीच अनुभवले आहेत. लग्न केल्यावर देखील लोक एकमेकांना समजु शकत नाही. मग लग्न करुन काय उपयोग.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rocky Jaiswal (@rockyj1)

रॉकी हिना आणि त्याच्या नात्या बद्दल बोलताना पुढे म्हणाला की, “आम्हाला एकमेकांना बांधून ठेवायचे नाही. सध्या आम्ही करिअरवर फोकस करत असून आमचं नातं कुठ पर्यंत जाते ते बघायचे आहे. आम्ही लग्न करू पण आत्ता आम्ही करियरवर फोकस करत आहोत. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात  या गोष्टीवर माझा विश्वास असून मी हिनाशी खूप चांगला बॉन्ड शेअर करतो आणि माझा विश्वास आहे की जोड्या स्वर्गात बनतात. आम्ही कोणतीच गोष्ट एकमेकांपासून लपवत नाही. तसच  फक्त पर्सनल लाईफ नव्हे  तर प्रोफेशनली सुद्धा एकमेकांच्या कामाचा आदर करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)


रॉकी जयस्वाल आणि हिना खानचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटांवर एकत्र काम केले आहे. यात हिना खानची  प्रमुख भूमिका असलेली ‘लाइन्स’ या शॉर्ट फिल्मचे नामांकन कांन्स फिल्म फेस्टिवलला झाले होते. हिना खान ही छोट्या पडद्यावरची पहिली अभिनेत्री आहे जी कांन्स  फिल्म फेस्टिवलला गेली होती. तिची ‘लाइन्स’ ही लघुकथा नुकतीच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress hina khan boyfriend rocky jaiswal opensup about marriage plans aad

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या